NC Times

NC Times

सीता नवमीचे महत्व व विधी महिलांनो अशाप्रकारे करा पूजा, अखंड सौभाग्यवतीचा मिळेल आशीर्वाद


 दरवर्षी सीता नवमी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. यंदा ही नवमी १६ मे २०२४ ला आहे. पौराणिक मान्येतनुसार या दिवशी सीता देवी पृथ्वीवर प्रकट झाली होती असे म्हटले जाते. त्यासाठी हा दिवस सीता नवमी किंवा सीता जयंती म्हणून साजरा केला जातो. याला जानकी नवमी असेही म्हटले जाते.
सीता नवमी ही भगवान श्रीरामाची पत्नी यांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी सीता मातेची विशेष पूजा केली जाते. ज्योतिष्यशास्त्राच्या मते सीता मातेला आदर्श भक्ती आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते. यादिवशी सीते मातेची पूजा केली जाते.
 हिंदू धर्मात ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी सीता मातेला प्रसन्न करण्यासाठी अनेक वस्तूही अर्पण केल्या जातात. तसेच विधीनुसार पूजा केल्याने व्यक्तीला लाभ होतो. तसेच आर्थिक चणचणही दूर होते.
या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात आणि सीता मातेची पूजा करतात. जाणून घेऊया तिथी आणि पूजा पद्धत
1. सीता नवमी २०२४ तिथी
उपवासाची वेळ - १६ मे सकाळी ६.२२ पासून सुरु होईल. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीची समाप्ती ही १७ मे २०२४ ला शुक्रवारी सकाली ०८.४८ मिनिटांनी संपेल.
पूजा करण्याची वेळ - सकाळी ११.०४ ते दुपारी १.४३ मिनिटे.
 2. पूजा विधी
सीता नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
पूजास्नान स्वच्छ करुन गंगाजलच्या पाण्याने धुवावे.
त्यानंतर प्रभू राम आणि सीता मातेची मूर्ती स्थापित करा.
चंदन, गंध, अक्षता, फुले-फळे, मिठाई, धुप आणि दिवा इत्यादी अर्पण करा. नंतर सीता नवमीच्या व्रताचे पठण करा.
उपवास करुन ध्यान करा. संध्याकाळी पूजा झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करा.
 3. पौराणिक कथा
धार्मिक मान्यतेनुसार मिथिलामध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळी राजा जनक फार अस्वस्थ झाले होते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी ऋषीमुनींनी यज्ञ करुन पृथ्वी नांगरण्याचा आदेश दिला. राजा जनकाने आपल्या प्रजेसाठी यज्ञ केला आणि मग नांगरण्यास सुरुवात केली. खणताना नांगर आतल्या वस्तूशी आदळला. माती काढल्यानंतर त्या सोन्याच्या बंडलमध्ये चिखलात गुंडाळेलली सुंदर मुलगी दिसली. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरु झाला. राजा जनकाने त्या मुलीला स्विकारून तिचे नाव सिता असे ठेवले.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.