NC Times

NC Times

रातोरात शेतकऱ्यांच नशीब फळफळल, बँकेच्या चुकीमुळे बनला अब्जाधीश


नवचैतन्य टाईम्स नवी दिल्ली (प्रतिनिधी)- पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतात. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाअंतर जूनमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात १७ व्या हप्त्याचे २,००० रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकार देखील तितकीच रक्कम शेतकऱ्यांना देते, परंतु ४,००० रुपयांऐवजी एखाद्याच्या खात्यात अब्जावधी रुपये जमा झाले तर... अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
होय, अलीकडेच एका शेतकऱ्याच्या बँक खात्यात तब्बल ९९९९९४९५९९९.९९ म्हणजे ९९ अब्ज रुपये जमा करण्यात आले, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यालाच नाही तर बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील भादोही जिल्ह्यातील ही घटना आहे. होय, एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यातून विनाकारण पैसे कट झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकले असतील. त्याचवेळी, बहुतेक वेळी चुकीचे शुल्कही कापले जातात आणि बँक कर्मचारी तांत्रिक त्रुटीचे कारण देत चूक समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण उत्तर प्रदेशच्या भादोही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत तर बँकेने उलटच केलं.
मोबाईलवर एक मेसेज आला अन्...
राज्यातील एका शेतकऱ्याच्या किसान क्रेडिट खात्यात अचानक ९,९०० कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याची अजब घटना घडली आहे. मोबाईलवर आलेल्या मेसेजमधून एवढी रक्कम जमा झाल्याची माहिती शेतकऱ्याला समजताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. किसान क्रेडिट कार्डद्वारे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची शेतकऱ्याने परतफेड केली नव्हती आणि रक्कम थकीत होती. सध्या बँकेने या शेतकऱ्याचे खाते होल्डवर ठेवले असून प्राथमिक तपासात प्रकरण तांत्रिक बिघाड असल्याचे बोलले जात आहे.
रातोरात शेतकरी झाला अब्जाधीश
दुर्गागंज पोलीस स्टेशन हद्दीतील अर्जुनपूर गावचे प्रकरण असून येथील रहिवासी शेतकरी भानुप्रकाश बिंद यांचे सुरियावन येथील बँक ऑफ बडोदा ग्रामीण बँकेत खाते आहे. १६ मे रोजी मोबाईलवर बँकेचा मेसेज आला जो त्यांना पहिले समजला नाही म्हणून त्यांनी शेजाऱ्याकडून वाचून घेतला. आपल्या बँक खात्यात ९९९९९४९५९९९.९९ (९९ अब्ज ९९ कोटी ९४ लाख ९५ हजार ९९९ रुपये) जमा झाल्याचे संदेशात लिहिले होते. एवढी मोठी रक्कम आपल्या खात्यात कोठून आली याचा शोध घेण्यासाठी त्यांनी बँकेत धाव घेतली.
बँक कर्मचाऱ्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का
बँकेच्या शाखेत जाऊन विचारपूस केल्यावर भानुप्रकाश बिंड यांचे खाते तपासले असता खरे निघाले कारण त्यांच्या बँकेत कोट्यवधी रुपये जमा होते. एनपीए खात्यात इतके पैसे कसे जमा झाल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनाही आश्चर्यचकित झाले. बँक मॅनेजरने खाते होल्डवर ठेवले आणि या प्रकरणाची त्यांच्या स्तरावर चौकशी सुरू केली.
यंत्रणेने घेतली ‘फिरकी’
बँक मॅनेजर आशिष तिवारी यांनी माध्यमांना सांगितले की, खातेदार भानू प्रताप यांचे KCC खाते असून त्यांनी त्यांच्या शेतावर कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम वेळेवर न भरल्यामुळे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट (NPA) बनल्यानंतर या प्रकारची चुकीची रक्कम दिसून येते. बँकेच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे खात्यात दाखवलेल्या रकमेसमोर वजा चिन्ह दिसत नाही. वजा चिन्ह नसल्यामुळे एवढी मोठी रक्कम खात्यात दिसत आहे.