NC Times

NC Times

बच्चू कडूंनी अमरावतीत काँग्रेस-भाजपला नाकीनऊ आणलं आत्ता सोलापुरातही समीकरण बदलणार


नवचैतन्य टाईम्स सोलापूर प्रतिनिधी(किरण शिंदे)-बच्चू कडूंनी यांनी अमरावतीत काँग्रेस-भाजपसमोर मोठी अडचण निर्माण केली आहे. नवनीत राणांसमोर प्रहारचा उमेदवार दिनेश बुंब यांना उभे करत तगडी फाईट दिली आहे. तसेच सोलापूर आणि माढ्यातही तशीच परिस्थिती निर्माण करण्याच्या तयारीत आता प्रहार पक्ष आहे. यामुळे अमरावतीसोबतच आता सोलापूर आणि माढ्यात राजकीय गणिती बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शेतकरी, दिव्यांग तसेच सामाजिक विषयावर आक्रमक होत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेली प्रहार संघटना सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीत अद्याप शांत आहे. मात्र लवकरच बच्चू कडू यांचा प्रहार शेतकरी पक्ष सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात लवकरच दे धक्काची भूमिका घेणार आहे. सोलापुरातील आक्रमक प्रहार शांत असले तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. प्रहारचे वादळ किंवा वावटळ नेमके कुणाला बाहेर काढणार आहे? हे लवकरच समोर येईल, अशी चर्चा सुरू आहे.
प्रहारची साथ कुणाला?
प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी अद्याप कार्यकर्त्यांना आदेश न दिल्याने प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारापासून दोन हात लांब आहेत. यामुळे प्रहार का शांत आहे? किंवा वादळापूर्वीची शांतता तर नव्हे ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रहार पक्षाच्या सोलापूरचे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नेहमी आक्रमक होत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. प्रहार पक्षासोबत अनेक जण हजारोंच्या संख्येने जोडले गेलेले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दिव्यांगाचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी सुद्धा प्रहार पक्षाची मोठी ताकद या ठिकाणी पहावयास मिळाली. साधारण ५० हजार पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला
राज्यातील प्रहार शांत
प्रहारचा आक्रमकपणा सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणूक प्रचारात दिसत नसल्याने त्यांची भूमिका काय, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. राज्याच्या सत्तेत सहभागी असलेले बच्चू कडू मात्र यावेळी त्यांच्या अमरावती येथे महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांचे विरोधात दंड थोपटून आपल्या प्रहार पक्षाचा उमेदवार दिनेश बुंब यांना उमेदवारी देऊन वेगळीच भूमिका मांडली आहे. याशिवाय राज्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी अद्याप कोणताच आदेश दिला नाही. यामुळे पदाधिकारीही शांत आहेत. ऐन निवडणूक टप्प्यात आल्यानंतर 'प्रहार' करण्याची भूमिका तर त्यांची नसावी ना असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
जातीय मुद्दे घेऊन प्रचार करायचं उद्घाटन झालंय, जलील यांची टीका
समाजातील विविध प्रश्नांवर प्रहार करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी २०२४ लोकसभा निवडणुकीत कुठेच दिसत नाहीत. यामुळे त्यांच्याही हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेले पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते ऐनवेळी काय निर्णय घेतील हे अद्याप अस्पष्ट आहे. बाहेरुन शांत असणारी प्रहार संघटना मात्र आतून वेगळीच रणनिती तर आखत आहे. प्रहारच्या ताकदीचा विजय आणि पराभवावर परिणाम होऊ शकतो. दक्षिण सोलापूर येथील मंद्रूप येथील शेतकऱ्यांचे आंदोलन असेल महापालिका परिवहन, तसेच लक्ष्मी विष्णू मिल कामगाराचा विषय असेल प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच आक्रमक भूमिका घेत हे सर्व विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला धक्का देत सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम ही प्रहार जनशक्ती पक्षाने केले आहे.