NC Times

NC Times

माडग्याळ मध्ये अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ प्रतिनिधी(विजय चौगुले)-पुण्यश्लोक राजमाता महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांची जयंती माडग्याळ तालुका जत येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर या आदर्श राजकर्त्या , सामाजिक कार्यकर्त्या व दातृत्व संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात स्वतःच्या कामाचा ठसा उमटविला होता  मंदिर जीर्णोदराचे काम त्यांनी हाती घेतले होते  देशात जलसंधारणाची कामे त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणात झाली त्यांच्या प्रत्येक कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळत आहे तसेच त्यांच्या कारकिर्दीत सातबारा हे नाव अमलात आले 
यावेळी  राजमाता अहिल्यादेवी प्रतिमेचे पूजन सरपंच सौ अनिता महादेव माळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करण्यात आले 
तसेच यावेळी सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम  सावंत व भीमसेन  पुजारी या शिक्षकांचा अहिल्यादेवी  जयंती उत्सव समितीतर्फे सत्कार करण्यात आला या जयंतीच्या निमित्ताने धनगरी ओव्यांचा कार्यक्रम माडग्याळ नगरीमध्ये बीर लिंगेश्वर डोळ्ळीन संघ बसर्गी सोमराया यांच्याविरुद्ध अमोग सिद्धेश्वर डोळ्ळीन संघ उमदी माणसिद्ध पुजारी यांच्यामध्ये जुगलबंदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला
यावेळी पंचायत समिती माजी सदस्य सोमण्णा हाक्के, यावेळी मार्केट कमिटीचे माजी तज्ञ संचालक विठ्ठल निकम उपसरपंच बाळासाहेब सावंत सांगली जिल्हा भाजप युवा मोर्चा सरचिटणीस कामाण्णा बंडगर, एकनाथ बंडगर, परशुराम बंडगर, चनबसू चौगुले, , ग्रा. प. सदस्य महादेव माळी, ग्रा.पं. सदस्य प्रभाकर चौगुले, मारुती कोरे, युवा नेते सुरेश हाक्के, दत्ता बंडगर आधी मान्यवर उपस्थित होते