NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील माजी सरपंच शिवराम दादु रास्ते यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील माजी सरपंच शिवराम (तात्या) दादु रास्ते (वय-९२) यांचे गुरुवार दिनांक २ रोजी दुपारी आकस्मित दुःखद निधन झाले.त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या सरपंच पदाच्या काळात गावात मोठ्या प्रमाणात विकासात्मक व समाजउपयोगी कामे केली होती.त्यामुळे त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक होत आले आहे.त्यांच्या पश्चात पाच मुले,एक मुलगी,सुना,जावई व नातवंडे असा परिवार असुन, रक्षा विसर्जन रविवार दिनांक ५ मे रोजी सकाळी ९ वाजता घाटनांद्रे नजीक पाचेगाव फाटा येथील घरालगत असणाऱ्या शेतात घेण्यात आले आहे.