NC Times

NC Times

पावसामुळे वीज खंडित, मोबाईलच्या उजेडात मतदान


नवचैतन्य टाईम्स  नवी मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-अचानक आलेल्या अवकाळी पावसात वीज गेल्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले असून,प्रभाग क्रमांक एक मधील धानसर गावात चक्क मोबाईल च्या उजेडात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली.लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर प्रसासनाकडून जय्यद तय्यारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ग्रामीण भागात मोडणाऱ्या मतदान केंद्रावर वीज गेल्यावर कोणत्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या दाव्याची पोल खोल झाली आहे.
 देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सोमवारी ( ता.13) मावळ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले.मतदारांच्या चांगल्या प्रतिसादात सुरु असलेल्या मतदान प्रक्रिये दरम्यान दुपारच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली या वेळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लहान मोठे वृक्ष कोसळण्याची शक्यता लक्षात घेत महावितरण कडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
परिणामी ग्रामीण भागात असणाऱ्या मतदान केंद्रात अंधार पडून मतदान प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती. काही काळानंतर ग्रामस्थांनी आणलेल्या चार्जिंगच्या बॅटऱ्या आणि मोबाईल टॉर्च च्या उजेडात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असली तरी घडलेल्या या घटनेमुळे प्रसासनाच्या दाव्यातील फोल पणा उघड झाला आहे.
 दरम्यान, पनवेल तालुक्यातील २० गावामध्ये मतदानास फटका बसला आहे. वादळी वारा, पावसामुळे वीज गेल्याने २० गावातील मतदानावर परिणाम झाला आहे. शाळेत सुरू असलेल्या मतदान केंद्रावर वीज गेल्याने अंधार झाला. अंधारात मतदान करण्यास अडथळा झाल्याने दोन - अडीच तास ताटकळत मतदारांना उभं राहावं लागलं होतं. वीज गेल्याने अनेक मतदार मतदान न करता परत गेले.
आज मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्याने मतदानावर त्यांचा काहीसा परिणाम पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी पावसामुळे मतदारांनी मतदान केलं नसल्याचं समोर आलं आहे.