NC Times

NC Times

प्रेमाच्या धुंदीत झाले आऊट ऑफ कंट्रोल, धावत्या बाईकवर रोमान्स करणाऱ्या कपलचा व्हिडीओ व्हायरल


काही लोकांना बाईक चालवताना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. विविध प्रकारचे स्टंट मारून ते लोकांचं लक्ष वेधून घेतात. अर्थात हे स्टंट पोलिसांपर्यंत पोहोचले की त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते. पण तरी देखील स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. पण या स्टंटबाजांच्या यादीत आता धावत्या बाईकवर रोमान्स करणाऱ्या कपलची भर देखील पडली आहे. होय, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक कपल धावत्या बाईकवर चक्क गळ्यात गळे घालून रोमान्स करताना दिसतेय. बरं, रोमान्स करण्यात ते इतके गुंग झाले आहेत की त्यांच्या आसपास इतरही गाड्या धावतायेत याचं भान देखील त्यांना उरलेलं नाही. शेवटी या कपलचं काय झालं हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. 
 ​जगाची पर्वा कुणाला?
राजस्थानमधील कोटा या ठिकाणी घडली आहे. कोटा-बूंदी रोडवर हर्बल पार्कसमोर एक कपल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी बाईकच्या टाकीवर बसलीये आणि बॉयफ्रेंडला मिठी मारून त्याचं चुंबन घेतेय. लक्षवेधी बाब म्हणजे पाठीमागून येणाऱ्या गाड्यांमधील लोकं त्यांना सावध करण्याचा प्रयत्न करतायेत. कारण रोमान्सच्या नादात जर बाईकचा तोल गेला तर गंभीर अपघात होऊ शकतो. पण हे कपल प्रेमात इतकं गुंग झालं आहे की त्यांना जणू अपघाताची भितीच उरलेली नाही. दरम्यान त्यांचा हा रोमान्स आसपासच्या लोकांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.                               हा व्हिडीओ १५ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या कपलविरोधात संताप व्यक्त केलाय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी देखील लगेचच शोधाशोध करून या कपलला ताब्यात घेतलं. मीडिया रिपोर्टनुसार बाईक चालवणाऱ्या तरुणाचं नाव मोहम्मद वसीम असं आहे. पोलिसी खाक्या पडताच त्याचं डोकं ठिकाणावर आलं. त्यांनी कान धरून आपल्या कृत्यासाठी माफी मागितली आणि यापुढे अशी कुठलीही गोष्ट करणार नाही असं आश्वासन दिलं. असो, तुम्हाला काय वाटतं अशा स्टंटबाजांवर कुठली कारवाई केली पाहिजे? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या