NC Times

NC Times

वादाला कंटाळून पत्नी माहेरी आली, मेव्हणा भाऊजीची समजूत काढण्यास जाताच मेव्हण्यावर कुऱ्हाडीने वार



नवचैतन्य टाईम्स वाशिम (प्रतिनिधी)-पतीच्या जाचाला कंटाळून माहेरी आलेली पत्नी परत सासरी जात नसल्याने माझ्या पत्नीला नांदायला का पाठवत नाही यावरून वाद झाला. रागाच्या भरात जावयाने मेव्हण्यावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना १ मे च्या रात्री मालेगाव तालुक्यातील वाघी गावात घडली होती. यामध्ये नारायण सांडे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यातआला.
 मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीच्या वारंवार होणाऱ्या भांडणामुळे पत्नी कंटाळून माहेरी निघून आली. त्यानंतर भाऊजीला समजावण्यासाठी गेलेल्या मेव्हण्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. विजय खेकाळे यांच्यात आणि त्यांच्या पत्नीमध्ये काही कारणास्तव वारंवार वाद व्हायचे. या वादाला कंटाळून त्यांच्या पत्नी माहेरी मालेगाव तालुक्यातील मुठा येथे काही दिवसांपूर्वी गेल्या. त्या भावाकडे राहत असताना माझ्या बहिणीला व्यवस्थित सांभाळून घ्या, असे बोलण्यासाठी आणि समजूत काढण्यासाठी जावयाकडे गेलेल्या मेव्हण्यावर भाऊजीने कुराडीने हल्ला केला. यात मेव्हणा नारायण सांडे (४७) यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
गंभीर जखमी झालेल्या नारायणवर सुरुवातीला अकोला आणि नंतर नागपूर येथे उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोन विवाहित मुली असलेल्या ५५ वर्षीय विजय खेकाळे आणि त्यांच्या पत्नी यांच्यामध्ये वारंवार वाद व्हायचे. या वादाला कंटाळून नेहमीप्रमाणे माहेरी भावाकडे गेल्या. मात्र काही दिवस उलटल्यानंतर भाऊ जावयाकडे वाघी गावात काही मित्रांसह बोलणी करण्यासाठी आणि समजूत काढण्यासाठी गेला असता त्याच्यावर जावयाने कुऱ्हाडीने डोक्यात वार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सुरुवातीला अकोला येथे उपचार करण्यात आले.
त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येते पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून शिरपूर पोलिसांनी आरोपी विजय खेकाळे (५५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुचेकर हे पुढील तपास करत आहेत.