NC Times

NC Times

कवठेमहांकाळमध्ये शुक्रवार पासून श्री शिवचिदंबर मंदिराचा द्वितीय वर्धापनदिनानिमीत्य विविध कार्यक्रमांचे आयोजन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-कवठेमहांकाळ शहरातील कमंडलू नदीच्या नजीक असणार्या श्री‌क्षेत्र स्वामी शिवचिदंबर महास्वामी मंदिराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दिनांक १० मे पासून सुरू होणार असून यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती सोहळा समितीचे चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांनी दिली.

यानिमित्ताने काकडा,भजन,कीर्तन,आरती,जागरसह विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.शुक्रवार दिनांक १०‌ मे ते‌ रविवार दिनांक १२ मे पर्यंत विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.शुक्रवार दिनांक १० मे रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ यावेळेत झी टॉकीज फेम हभप अनिल महाराज (तडवळेकर) यांचे किर्तन होणार आहे.शनिवार दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ यावेळेत झी टॉकीज फेम युवा किर्तनकार हभप हणमंत महाराज (आटपाडकर) यांचे किर्तन होणार आहे.तर रविवार दिनांक १२ रोजी सकाळी हभप भागवताचार्य हभप प्रेमानंद महाराज शास्त्री यांचे किर्तन होणार आहे.या कार्यक्रमा निमित्ताने कवठेमहांकाळ, मणेराजुरी,दरीबडची येथील भजनी मंडळाचा जागर होणार आहे.याच‌दिवसी दुपारी ४ ते रात्री ८ यावेळेत सुवाद्यासह श्रीच्या मुर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.तसेच याच‌‌  दिवसी दुपारी १२ ते रात्री ९ यावेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.तरी यांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावे असे आवाहनही चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांनी केले आहे.