NC Times

NC Times

आजपासून घाटनांद्रेत श्री सिद्धनाथ देवाची यात्रेस प्रारंभ


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर (जालिंदर शिंदे)-आजपासून घाटनांद्रे (ता  कवठेमहांका) येथील श्री सिद्धनाथ देवाची यात्रा भरणार असुन यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा कमेटीच्या वतीने देण्यात आली. तर याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी,व्यापारी वर्गानी घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
     आज शुक्रवार दिनांक १० मे रोजी देवाची बोणी व नैवेद्य असुन,पहाटे पाच वाजता श्रीचा पुजाआर्चेसह अभिषेक करण्यात येणार आहे.तर अगदी सकाळ पासूनच मानाच्या भांगेचे वाटपही होणार आहे.तर संध्याकाळ नंतर शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात येणार आहे.
    तर शनिवार दिनांक ११ मे हा यात्रेचा मुख्य दिवस असुन, सकाळी १० वाजल्यापासून गावातील प्रमुख मार्गावरून सुवाद्यासह श्रीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.तर सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत वगसम्राज्ञी कु कमल-अनिता कराडकर यांचा लोकनाट्याचा तमाशा होणार आहे.त्याचबरोबर दुपारी चार नंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.तरी यांचा लाभ पाळणेवाले,खेळणीवाले,व्यापारी वर्गानी व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.