NC Times

NC Times

बळीराजाला मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ / वार्ताहर(विजय चौगुले)- 
शेती मशागतीची कामे खोळंबली,आचारसंहितेमुळे शेतकरी  अडचणीत वैशाख वणव्यात होरपळणाऱ्या बळीराजाचा यंदाही वळवाने पुरता अपेक्षा भंग केलाआहे.परिसरात अधाप एकही दमदार पाऊस बरसला नाही . पाण्याच्या दुर्भिक्षतेचा पशू पक्षीसह मानवाला व शेतीला भीषण पाणी बाणीचा समाना करावा लागत आहे. जीवाची कायली करून सोडणारा अंसह उकाडा व कमालीची ऊन यामुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर विपरीत परिणाम जाणवत आहे.
अद्यापही पेरणीपूर्वी शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत .शेतकरी राजाने नांगरट केली असली तरी बाकीची कामे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.द्राक्ष बागा जगविण्यासाठी बळीराजाला टँकरचा आधार घ्यावा लागत आहे . 2012 नंतर यंदाही द्राक्ष श्रेत्रात पाण्याच्या कमतरतेमुळे कुराड चालवावी लागत आहे.बऱ्याच शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा काढून टाकण्याचा सपाटा लावला आहे.नवीन द्राक्ष लागवडीत कमालीची घट झाली आहे .
रोहिणी नक्षत्र जवळ आले , असून ,यामध्ये वळवाचा पाऊस अपेक्षित आहे.हा पाऊस पडला की खरीपपूर्व शेती मशागतीची कामाला वेग येतो .परंतु यंदा भारतीय भूखंडांवर मान्सून वेळेत आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे . पूर्व मोसमी पावसाच्या सरी म्हणजे मान्सूनच्या आगमनाची सुवार्ताच असते ,पण दुर्दैवाने यावर्षी वळवाने पाठ फिरवली आहे .
त्यात निवडणूक आचारसंहिता यामुळे बळीराजा आर्थिक गर्तेच्या दूष्ट छायेत आहे . गेली सलग तीन वर्षे पावसाने ओढ दिल्याने बळीराजाला न खरीप पदरात पडला रब्बी यामुळे शेतीवर अवलंबून असणारा बळीराजा पुरता कोलमडून पडला आहे . सरकारी यंत्रणाही तोकडी पडताना दिसत आहे .वळीव बरसला तरच शेतीपूर्व मशागतीच्या कामाला वेग येणार आहे . शिवाय पाणी टंचाईवरही मात होणार आहे . ओसाड बनलेली  काळी आई हिरवा शालू नेसून पुन्हा एकदा नवा साज धारण करून मोठ्या दिमाखात नव्या जोमाने उभी राहणार आहे .जनावरांना चारा उपलब्ध होणार आहे. पाण्याविना पशू पक्ष्यांच्या चाललेली  घालमेल व धडपड कमी होण्यास मदत होणार आहे .