NC Times

NC Times

माडग्याळ येथील न्यू इंग्लिश स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक अशोक धायगोंडे सर यांचे सेवानिवृत्ती निमीत्य सत्कार सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर(विजय चौगुले)-
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, माडग्याळ प्रशालेतून आज दिनांक 31 मे,2024 रोजी नियत वयोमानानुसार पर्यवेक्षक श्री धायगोंडे ए.टी. सर आपण सेवानिवृत्त होत आहात,त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
शिक्षणासारख्या पवित्र अशा क्षेत्रात गेली अनेक वर्ष आपण दि फ्रेंड्स असोसिएशन संस्थेच्या मुचंडी,जत हायस्कूल ,जत ,कुंभारी व माडग्याळ इ. शाखांमधून गणित व विज्ञान या विषयाचे ज्ञानदान केलेले आहे. आपल्या सेवाकाळात आपण आपल्या कर्तव्याप्रती नेहमीच ठाम राहिलात. जत सारख्या दुष्काळी भागातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी शैक्षणिक प्रवाहात आली पाहिजे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या ध्येयाने आपण नेहमी प्रेरित राहिलात. आपल्या विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली. जिद्द ,चिकाटी, आत्मविश्वास व आपल्या कमावरची श्रद्धा आम्हाला नेहमीच दिसून आली.
गुरुविन कोण दाखविल वाट या उक्ती प्रमाणे 
आपले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आत्मविश्वासाने त्यांची कारकीर्द बजावत आहेत. याचे सर्व श्रेय एक गुरू म्हणून आपणास जाते. आपल्या स्वभावात दया ,सुख ,शांती, समाधान ,संयम असे अनेक गुण मला दिसून आले.
आपण विद्यार्थ्यांच्या साठी उत्तम मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत म्हणून आपली  शैक्षणिक कारकीर्द उत्तमपणे पेलली आहे.
कर्तव्यतत्परता  व वक्तशीरपणा हे तुमचे विशेष पैलू आहेत. 
अशा आपल्या उत्तम शैक्षणिक कार्याची दखल दैनिक सकाळ उद्योग समूहाने घेत आपणास आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
शिक्षक ते पर्यवेक्षक असा शैक्षणिक प्रवास करत असताना आपण कोणाचेही मन न दुखवता सर्वांचा आदर केला आहे. मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यामधील योग्य समन्वय आपण नेहमीच राखला आहे. आपल्या सहकारी  शिक्षकांच्या उल्लेखनीय कामाचे आपण नेहमीच कौतुक करत आला आहात. तसेच काही उपचारात्मक बाबींचा सल्लाही आपण दिला आहात जो खूप मोलाचा होता. एक पर्यवेक्षक असून सुद्धा आपण कधीही आपल्या पदाविषयी गर्व बाळगला नाही. हा आपल्या मनाचा खूप मोठेपणा आहे. विद्यार्थी असो किंवा सहकारी शिक्षक असो सर्वांशी आपण आदराने सल्लामसलत केली.  आपण सर्व  पालक बंधू  - भगिनी यांना विश्वासात घेऊन योग्य मार्गदर्शन केले आहे. समोरील व्यक्तीच्या मनातील राग कमी करण्याचे एक अनोखे कौशल्य आपणास आत्मसात आहे. 
एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली  ओळख नेहमीच राहील.
संस्था शाळा यांच्या जडणघडणीत आपले उल्लेखनीय योगदान आपण दिले आहे. 
विनातक्रार आपण आपले शैक्षणिक कार्य पार पाडले आहे.
आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्याला शैक्षणिक कार्यात कोणताही अडथळा न आणता ते पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहनच दिले आहे. यामध्ये आपल्या सौभाग्यवती यांचा सिंहाचा वाटा आहे. 
आपल्या कार्यकर्तुत्वाचा झेंडा संस्थेच्या सर्व शाखांमधून फडकत राहील. आपण दिलेल्या शैक्षणिक योगदानाबद्दल आपणास ,आपल्या कार्यास  सलाम . सेवानिवृत्तीनंतर चे आपले जीवन सुख समृद्धी  देणारे व आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आपणास परत एकदा सेवा निवृत्तीच्या, सेवापूर्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा