NC Times

NC Times

जत येथील सिद्धार्थ पब्लिक स्कूलचा सीबीएसई दहावीचा निकाल ९५% लागल्याने आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ प्रतिनिधी(विजय चौगुले)-   सीबीएसई बोर्डाच्या २०२३-२४ च्या दहावी परीक्षेत सिद्धार्थ पब्लिक स्कूल जतचे सलग पाचव्या वर्षी 95% चांगला निकाल लावून शाळेने इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणातील गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे 
शाळेचे प्रथम क्रमांक 1) कुमारी आयुष धनाजी टोणे 95.8% 
 2) द्वितीय क्रमांक  कुमारी वैष्णवी विष्णुपंत साळे 95.6% 
3) तृतीय क्रमांक कुमारी आर्या नारायण खोत 94.8% व कुमारी  समृद्धी अर्जुन सौदे 94.8% 
4) चतुर्थ क्रमांक कुमार प्रबोध रवींद्र कांबळे 91% यांनी क्रमांक मिळविला                                                    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जत तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांना झाडांची कमतरता व दुष्काळ लक्षात घेता मुलांना हार व श्रीफळ न देता झाडे देऊन सत्कार करत निसर्गाबद्दल प्रेम व आपुलकी निर्माण करून देण्याचे काम केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,
तसेच सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी आणि श्री उमाजीराव सनमडीकर  मेडिकल फाउंडेशन जत संस्थेचे अध्यक्ष सौ डॉ. वैशाली कैलास सनमडीकर  व सचिव डॉ. कैलास उमाजीराव सनमडीकर  शाळेचे प्राचार्य श्री के श्यामसुंदर कोळी सर  व शिक्षकेतर आणि कर्मचारी वर्गांचे आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्याकडून शाळेचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले.