NC Times

NC Times

मतदारसंघ भाजपचा उमेदवार मनसेचा दावा शिंदेंच्या शिवसेनेचा कोकण पदवीधर निवडणूक

नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)   लोकसभा निवडणुकांचा निकाल लागण्यास अद्याप एक आठवडा बाकी असतानाच, आता विधान परिषद निवडणुकांवरुन वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंनी दोन, तर राज ठाकरेंनी एका जागेवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना चारही जागा लढवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकांना महायुती सामोरी जाणार, की सर्व पक्ष स्वबळावर लढणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांवर निवडणूक लागली आहे. या चारही जागांवर शिंदेंची शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. अल्पावधीतच शिवसेना उमेदवार यादी जाहीर करणार आहे. या चारही जागा शिवसेनेने मागच्या वेळी लढवल्या होत्या आणि त्यांना चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे या जागांसाठी सेना नेते इच्छुक आहेत.

 एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले संजय मोरे कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. ते शिवसेनेचे सचिव असून, ठाण्याचे माजी महापौरही आहेत. १९९७ ते २०१२ या काळात सलग तीन वेळा त्यांनी ठाणे महापालिकेचे नगरसेवकपद भूषवले आहे.
 विशेष म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तिथे सकाळीच मनसेने अधिकृत उमेदवार जाहीरही केला आहे. अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधरचं तिकीट देण्यात आलं आहे. अद्याप डावखरेंचं काय होणार, हे स्पष्ट झालेलं नसतानाच, आता महायुतीतील तिसऱ्या भिडूनेही शड्डू ठोकल्याने सगळे पक्ष स्वतंत्र लढणार की एकमताने एका उमेदवारावर निर्णय होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंनी उमेदवार दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेसाठी मुंबई, ठाणे, कल्याणमधील उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या. अशात मनसेविरुद्ध उमेदवार देऊन ते राज ठाकरेंचा रोष ओढवून घेणार का, मनसेचा केवळ वापर करुन घेतल्याचा मेसेज मतदारांना देणार का, असे प्रश्न आहेत. त्यामुळे शिंदे काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.