NC Times

NC Times

वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटात फूट, अनेक शाखाप्रमुख शिंदे गटात प्रवेश


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या डोंबिवली दौऱ्यानंतर आणि कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख, महिला संघटक, युवती सेना जिल्हाध्यक्ष यांच्यासह १०० कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत करणार प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील नाराजी उघडपणे समोर आली आहे.
 जसजश्या निवडणुक जवळ येऊ लागल्या तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. कल्याण लोकसभा हा शिवसेना बालेकिल्ला असून शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर निवडणुकीसाठी उभे आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे स्वतः तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे असून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर त्यांच्या समोर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
 यातच अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी ७ माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रदीप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता ठाकरे गटाचे पदाधिकारी यांचा प्रवेश ठाण्यात होणार आहे.
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात प्रवेश करणार
उद्धव ठाकरे गटातील शहर प्रमुख, महिला संघटक, युवती सेना जिल्हाधिकारी यांच्यासह १०० एक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात करणार प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज पदाधिकारी यांची धुसफूस पुढे आली आहेत.
विवेक खामकर -शहरप्रमुख कवीता गावंड -महिला जिल्हासंघटक लीना शिर्के - युवती सेना जिल्हाधिकारी
किरण मोंडकर - उपशहर संघटक राधिका गुप्ते - कल्याण पूर्व विधानसभा संघटक राजेंद्र नांदुस्कर -उपशहर संघटक
श्याम चौगुले -विभाग प्रमुख सुधीर पवार -विभाग प्रमुख
शिवराम हळदणकर -विभाग प्रमुख नरेंद्र खाडे -उपविभाग प्रमुख सतीश कुलकर्णी -उपविभाग प्रमुख प्रशांत शिंदे -उपविभाग प्रमुख प्रसाद चव्हाण -शाखाप्रमुख विष्णू पवार -शाखाप्रमुख मयूर जाधव -शाखा प्रमुखपक्ष व इतरांची  प्रवेश करणाऱ्याची यादी समोर आली आहे.