NC Times

NC Times

जत तालुक्यास 99कोटींचा निधी मंजूर आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्याला यश


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ प्रतिनिधी(विजय चौगुले)-जलसंपदा विभागांतर्गत अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मा.आमदार श्री विक्रमसिंह सावंत, यांच्या विशेष अथक प्रयत्नातून जुन्या सिंचन प्रकल्पांची देखभाल व दुरुस्ती करणे कामासाठी आणि पाणी वापर कार्यक्षमता वाढवणे निर्मित व वापरातील सिंचन क्षमतेतील तफावत दूर करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे,
जे प्रकल्प प्रगत अवस्थेत आहेत व ते तातडीने पूर्ण करून पुढील तीन वर्षांमध्ये सिंचनाचा योग्य लाभ येथील शेतकऱ्यांना होऊ शकतो, 
 महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे विभाग अंतर्गत जत तालुक्यातील  एकूण ६ ल.पा.तलाव, ५ को.प.बंधारा, व १ मध्यम प्रकल्प सर्व सिंचन सुधारणा प्रकल्पासाठी ९९.०६ कोटी निधी उपलब्ध झाला आहे .
ल.पा.तलाव 
१) वाळेखिंडी -४.६०, २) प्रतापूर  -४.३०, ३) डफळापुर -२.५० ४) रेवनाळ -३.००, ५) सोरडी -५.४५, ६) कोसारी  -५.६०,को.प. बंधारे १) सिंगनहळ्ळी -२.५०, २) करजगी  -४.५०, ३) बोर्गी -४.५०, ४) बालगाव -३.७१, ५) बेळोडगी -४.१०, मध्यम प्रकल्पांतर्गत १) संख    - ५४.०० 
 एकूण रक्कम ९९.०६ कोटी इतका निधी मंजूर झाला असून लवकरच कामास सुरुवात करून येणाऱ्या पुढील काळात सिंचनासाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न दूर केला जाईल.
 जत तालुका हा नेहमी आवर्षणग्रस्त दुष्काळ असल्याने येथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांना लागणाऱ्या पाण्याचा लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे कुठेतरी जत तालुक्याचा दुष्काळ नावाचा हा कलंक पुसला जावा यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून पाणीदार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी निधी मंजूर करून आणला आहे.