NC Times

NC Times

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून दोन वर्षात जत तालुक्यात 680 कोटीचे कर्ज वाटप - संचालक मा.प्रकाश जमदाडे


नवचैतन्य टाईम्स  बिळूर प्रतिनिधी(संजय कोटगोंड)-
दोन वर्षात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जत तालुक्यात 680 कोटीचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती जि.म बॅंकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली. जमदाडे म्हणाले की
३६ सभासदांना सर्व सामान्य कर्ज ६६ लाख ९५ हजार,२७० सभासदांना दुभती जनावरे व गोठा बांधकामसाठी ५ कोटी २९ लाख,१० सभासदांना शेळी मेंढी पालनसाठी २९ लाख ९१ हजार, ५ सभासदांना विहीर खुदाईसाठी  १४ लाख ३८हजार, कुक्कूटपालनसाठी ६ लाख ७५ हजार, ३ सभासदांना  शेतजमिन खरेदीसाठी ३८ लाख ३० हजार, ३ सभासदांना ट्रॅक्टर खरेदी १७ लाख ७१ हजार, सभासदांना पाईप लाईनसाठी २६ लाख ६७ हजार,सबमर्सिबल,   पंपासाठी ४५ हजार, ३६ सभासदांना  द्राक्षभाग उभारणी कामी १ कोटी ८७ लाख ५५ हजार असे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 
जत तालुक्यातील दोन हजार ३८६ शेतकऱ्यांना  याचा लाभ झाला असून त्यांचा १४ कोटींचा फायदा झाला आहे. जत तालुक्यातील चार सोसायटींची शंभर टक्के वसुली झाली असून. जून अखेर शंभर टक्के वसुली होणार आहे. त्यामुळे जत तालुक्यातील दहा टक्के येणार असून गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचाविण्याचा प्रयत्न केला जि.म बँकेचे चेअरमन आमदार मानसिंग (भाऊ) नाईक व्हाईस चेअरमन श्रीमती जयश्रीताई पाटील व संचालक सरदार पाटील संचालक मन्सूर(चाचा) खतीब यांची मोलाची साथ मिळाली. जि.म बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान असल्याचे जमदाडे म्हणाले.या पुढील काळाची व्यापारी असो उद्योग असो यासाठी कर्ज पुरवठा करणार असून. त्याचबरोबर महिला बचत गटाना कर्ज वाटप करून त्यांच्या आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. असे जि.म बॅंकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.