NC Times

NC Times

आठवणीत रंगला माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 22 वर्षानी पाखरांच्या किलबिलाटाने गजबजली नागज येथील श्री सिध्देश्वर हायस्कूल


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख) - शाळेचे जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसडून वाहत होता आवडते मज मनापासून शाळा लावीते लळा जशी माऊली बाळा शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर श्री सिध्देश्वर हायस्कूल नागज विद्यालयात 2002 मध्ये दहावीत असलेले माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले 12 मे 2024 रोजी शाळेमध्ये या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी विरेश स्वामी,सुरेश पवार,सचिन तेली,हणमंत देशमुख,उत्कर्ष कानडे,यांनी पुढाकार घेऊन मेळाव्याचे आयोजन केले होते. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी जवळजवळ 22 वर्षानंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपल्या शाळेचे जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते करून माझी विद्यार्थी हणमंत देखमुख यांचा वाढदिवस साजरा करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.




ह्यात नसलेल्या मित्रांना अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहून कार्यक्रम पुढे सुरू झाला.

तर अनेकांनी ही भेट आणि आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील. अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थी भावूक झाल्याचे दिसून आले. प्रत्येक जण आपली शाळा कशी आहे .हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाचे सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थीनी या ठिकाणी उपस्थित होता. आम्ही या शाळेतील शिक्षकामुळे घडलो हे भाव मनी जपत आपोआप कित्येक जणांचे हात त्या गुरुजन वर्गांच्या पायापर्यंत जात होते. नतमस्तक होत होते. वर्गमित्र भेटल्यांचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हणमंत देशमुख यांनी शालेय जीवनातील 20 ते 25 वर्षाच्या जुन्या शालेय जीवनातील काही साहित्य दाखवून आश्चर्यचकित केले.तसेच सर्व विद्यार्थी मित्रांना सर्व ग्रुपचा लँमिनेशनसहीत 8x12 चा फोटो सर्वाना भेट म्हणून  दिले तर यावेळी सिंधूताई दुधाळ(भानुसे)यांनी 'राधे चल माझ्या गावाला जाऊ' हे गीत सादर करुन सर्वाना चाल धरायला लावले.
तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीनी स्वादीष्ट भोजनाचा आस्वाद घेत पून्हा एकत्र येण्याचा संकल्प करुन एकमेकांना निरोप दिला यावेळी विरेश स्वामी, सुरेश पवार, दत्ता माने, सचिन कुंभार, सुलिंदर दुधाळ, सचिन तेली, उत्कर्ष कानडे, दिनेश रुपनर, जालिंदर मोहिते, हनुमंत हाके, विलास मदने, बालाजी भोसले, आझर बारस्कर, जयसिंग देवकते, राजू मुल्ला, किरण शिंदे, विक्रम हंकारे, संभाजी शिंदे, भगवान खोत,सिंधुताई दुधाळ, सावित्री घागरे, सुषमा पोरे, रूपाली स्वामी, अर्चना डुबुले, मनीषा साबळे, अर्चना सूर्यवंशी, छाया माळी, आदी उपस्थित होते.