NC Times

NC Times

न्यू इंग्लिश स्कूल माडग्याळचा 100 टक्के निकाल

 
नवचैतन्य टाईम्स माडग्याळ / वार्ताहर(विजय चौगुले)- 
माडग्याळ ता जत येथील न्यू इंग्लिश स्कूलचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला . कला शाखेचा निकाल 98 टक्के निकाल लागला आहे . 
बारावी विज्ञान व कला शाखेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एस.आय. हिरगोड ,पर्यवेक्षक अशोक धायगोंडे यांनी अभिनंदन केले .
विज्ञान शाखेतील प्रथम तीन विद्यार्थी याप्रमाणे  तेजस्वी महादेव कोरे ( 77.67 ),दुसरा अभिषेक अर्जून पुजारी (72.33) ,तिसरा सूष्टी सिध्दाप्पा माळी ( 72 ) ,कला  
शाखेतील प्रथम तीन विद्यार्थी असे = भागवत बंडू सांळुखे (७७) ,बाळाप्पा शंकर माळी ( ७५. ६७ .) धानेश्वरी निंगाप्पा माळी ( ७३. ८३ .) व रुपाली संभाजी एरंडे ( ७३. ८३.)
विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल या शाळेचा लागला आहे .कला शाखेचा निकाल 98 टक्के लागल्याने मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिक्षक  शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या .