NC Times

NC Times

वाघोलीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-सालबादाप्रमाणे याही वर्षी वाघोली (ता कवठेमहांकाळ) येथे वैकुंठवासी हभप विवेकानंद वास्कर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने रामनवमी ते हनुमान जयंती यादरम्याने होणाऱ्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा,ग्रंथ व वीणा पुजन करण्यात आले.यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर पारायणा दरम्याने विविध प्रकारच्या  धार्मिक  कार्यक्रमाचे  आयोजन  करण्यात आले  आहे.यामध्ये ज्ञानेश्वरी,वाचन,भजन,किर्तन,प्रवचन,जागर,    काकडा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमाचा यामध्ये समावेश आहे.
बुधवार दिनांक १७ रोजी ५ ते ६ हभप संपतराव जाधव महाराज (तिसंगी) यांचे प्रवचन व रात्री ९ ते ११ यावेळेत हभप सुभाष महाराज (विसापुर) यांचे किर्तन होणार आहे तर त्यानंतर लगेचच वाघोली भजनी मंडळाचा जागर होणार आहे.गुरुवार दिनांक १८ रोजी सायंकाळी ५ ते ६  हभप विठ्ठल पाटील महाराज (करमाळा) यांचे प्रवचन तर ९ ते ११ यावेळेत त्यांचेच किर्तन होणार आहे.त्यानंतर लगेचच गर्जेवाडी,वाघोली व कुंडलापुर येथील भजनी मंडळांचा संयुक्तरित्या जागर होणार आहे.शुक्रवार दिनांक १९ रोजी सायंकाळी ५‌ ते ६ यावेळेत हभप गुलाब शिंदे महाराज (घाटनांद्रे‌) यांचे प्रवचन व रात्री ९ ते ११ यावेळेत त्यांचेच किर्तन होणार त्यानंतर लगेचच डोंगरसोनी, घाटनांद्रेत व वाघोली यांचा संयुक्तरीत्या जागर होणार आहे.शनिवार दिनांक २० रोजी सायंकाळी ५‌ ते ६ यावेळेत हभप तानाजी जाधव -महाराज (सुलतानगादे) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ यावेळेत हभप बी पी मिरजकर यांचे किर्तन होणार आहे.तर त्यानंतर घाटनांद्रे व वाघोली भजनी मंडळांचा संयुक्तरित्या जागर होणार आहे.रविवार दिनांक २१ रोजी सायंकाळी ५‌ ते ६ यावेळेत हभप नामदेव महाराज माडगूळकर यांचे प्रवचन व रात्री ९ ते ११ यावेळेत हभप अमोल गवळी महाराज (ढवळी) यांचे किर्तन होणार आहे तर त्यानंतर तिसंगी,शेळकेवाडी व वाघोली यांचा संयुक्तरित्या जागर होणार आहे.सोमवार दिनांक २२ रोजी ५ ते ६ यावेळेत हभप नेताजी जाधव महाराज (पळशी) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ यावेळेत हभप नवनाथ महाराज (चांदेकर) यांचे किर्तन होणार आहे तर त्यानंतर लगेचच घाटनांद्रे भजनी मंडळ - तळेवस्ती व वाघोली भजनी मंडळ यांचा संयुक्तरित्या जागर होणार आहे.सदर पारायण कार्यक्रमात व्यासपीठ चालक म्हणून हभप गोरख (दादा) पाटील हे काम पहाणार आहेत तर मृदंगमनीची साथ संभाजी नागणे (पंढरपूर) यांची व किर्तनसाथ ही हभप धनंजय खराडे (तिसंगी) यांची रहाणार आहे.
मंगळवार दिनांक २३ रोजी सकाळी भव्य ग्रंथदिंडी व पालखी मिरवणूक निघणार असुन तदनंतर हभप नवनाथ महाराज महाराज (चांदेकर) यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.तरी याचा भविकभक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.