NC Times

NC Times

टोमॅटो पिकातून तडवळे गावचे शेतकरी महेंद्र झांझुरणे यांनी घेतले लाखों रुपयाचे उत्पन्न


नवचैतन्य टाईम्स सातारा /कोरेगाव प्रतिनिधी ( राजेंद्र शेडगे ) कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावाचे प्रगतशील शेतकरी महेंद्र झांझुरणे यांनी एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो पिकाचे योग्य पद्धतीने नियोजन करून लाखों रुपयाचे उत्पन्न घेतले.महेंद्र यांनी अजून सुमारे तीन एकर टोमॅटो पिकाची लागवड केली आहे.त्यांनी तडवळे भागातील आसपासच्या शेतकाऱ्याना टोमॅटो व इतर भाजीपाला पिकासंबंधित माहिती मिळावी यासाठी त्यांनी खुशालदास गोविंददास शहा यांच्या मार्गदर्शना खाली वालग्रो बायोसायन्स प्रा.लि.या कंपनीचा त्यांच्या व अनिस मुलाणी यांच्या शेतामध्ये पीक पाहणी व टोमॅटो पिकासंबधित मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . 

महेंद्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की टोमॅटो पिकाचे योग्य पद्धतीने नियोजन कसे करावे व त्यातून आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येवू शकते , ते बोलताना म्हणाले की मी कोरेगावचे खत ओषध दुकानदार खुशालदास शहा याचे मार्गदर्शनाने वालग्रो कंपनीची खत ओषध वापर करून टोमॅटो पिकातून आर्थिक प्रगती केली . महेंद्र यांच्या सध्या चालू असलेल्या टोमॅटो पिकासाठी त्यांना सुमारे एक लाख साठ हजार खर्च आला . त्यातून त्यांनी आतापर्यंत सुमारे तीस टन मालाची तोंडणी करून त्यांना दोन लाख चाळीस हजार रुपये उत्तन्न मिळाले आहे . अजून त्यांना दहा टन टोमॅटोचा मालाची तोंडणी होईल असा अपेक्षित अंदाज आहे . 
कार्यक्रमावेळी वेलाग्रो कंपनीचे सातारा जिल्हा प्रमुख नामदेव सोनवलकर यांनी टोमॅटो पिकावर येणार जैविक आणि अजैविक तान या विषयी सखोल मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाला कोरेगाव भागातील शेकडो शेतकरी उपस्थित होते . त्याच बरोबर डेवनेट सोल्युशन चे डारेक्टर प्रवीण शिंदे , साताराचे कृषितज्ञ रोहन जगताप आदि मान्यवर उपस्थित होते .