NC Times

NC Times

शरीरात वात वाढलाय तर काय खावे....


 नवचैतन्य  टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- स्नायूंचे थकणे,सांधेदुखी,सांधे आखडणे,डोके दुखी,अपचन,वजन घटणे,मरगळ,शरीर ताठरणे,शरीर        थरथरणे,अशक्तपणा,पोटदुखी,कोरडेपणा,भीती या आजा    -रांच्या त्रासाला नक्कीच शरीरात वात दोष कारणीभूत असतो... शरीरात वात वाढलाय तर काय खावे...किमान १  चमचा शुद्ध तूप एकावेळी आहारात हे वातावरण नियंत्रण ठेवणारे आहे.(त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदरपासून ठेवणे आवश्यक आहे)   

 
वात प्रकृतीच्या व्यक्तीने काय खावं... आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट,खारट, तिखट कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यांव. आहारात मधुर रसाची फळ खावेत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावा. तीळ जवस कारळे या तेल बियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यांने वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.                  वात वाढल्या नंतर काय खाऊ नये... सर्व प्रकारच्या कोरड्या उसळी, कोरडे अन्न, थंड अन्न, स्नेह नसलेले पदार्थ (तूप तेल विरहित पदार्थ) मेथी, शेपू ,पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या, मैद्याचे तळलेले पदार्थ, डबा बंद पदार्थ, शिळे अन्न, उशिरा आंबवलेले अन्नपदार्थ, वाळवलेले फळे, आंबट फळे, आंबट पदार्थ, मासे, पपई, अननस, कच्चा भाज्या, कच्चा कांदा, चणाडाळ, वाळलेले काजू, सोयाबीन, पांढरा तसेच काळा वाटाणा, कारले, मका ,काकडी, पांढरा कोंडा, बकरीचे- डुकराचे मांस वात दोषाची वाढ करतात.            या यादीकडे पाहिलं तर असं लक्षात येते की वृध्दापकाळात अति अभ्यास करून हेच पदार्थ खाताना व्यक्ती आढळतात. म्हणजेच डायट करण्याच्या   अट्टाहासात आपण जे खायला नको तेच खातो हे पदार्थ संख्यात्मक दृष्ट्या कदाचित चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील पण गुणात्मक दृष्ट्या संपूर्ण शरीराची स्थिती बिघडवतात.