NC Times

NC Times

रामनवमी तारीख, पूजा विधी आणि महत्त्व

  
रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्री रामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला, कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो. रामनवमी फक्त भारताच नाही तर जगभरात साजरी केली जाते. या वेळी नवरात्रीची सुरुवात ९ एप्रिलला होत आहे. चला जाणून घेऊया रामनवमी कधी आहे?
 रामनवमी केव्हा आहे?
पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ १६ एप्रिलला मंगळवारी दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी होईल आणि नवमी तिथी १७ जानेवारीला दुपारी ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत असेल. उदया तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी १७ एप्रिलला साजरी होईल. १७ एप्रिलला पूर्ण दिवस रवी योग असणार आहे.
 भगवान श्रीरामाची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि राम रक्षा स्तोत्र यांचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी राहील. या दिवशी भगवान श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पण करावा.
 घरी रामनवमीची पूजा कशी करावी?
जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते.
पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या.
यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा.
त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात.
मग चंदनाचा टिळा लावावा.
त्यानंतर अक्षता, फूल अशी पूजेची सामग्री अपर्ण करावी.
मग तुपाचा दिवास लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालिसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करावे.
तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदर कांडमधील पाठ आणि हनुमान चालिसा यांचे पठणही करू शकता.