NC Times

NC Times

केसांमध्ये कोंडा झाला आहे मग करा हे घरगुती उपाय....


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-                                                           मेथीची पूड पाण्यात घालून लेप तयार करावा,आणि सबंध डोक्यावर लावावा.एक तासानंतर डोके धुवून टाकावे.      केस धुताना वारंवार लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास फायदा होतो.                                            दोन-तीन दिवसाचे शिळे(आबंट दही),थोडासा लिंबाचा रस,व्हिनिगर  आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी होऊ शकतो.                                                मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.सकाळी त्याची पेस्ट करुन घ्या.मग तुम्ही ही पेस्ट आणि दही एकत्र करुन स्काल्प आणि केसांच्या मुळापर्यत लावा.            त्याचबरोबर मसाज देखील करा.मग ३० मिनीटाने केस धुऊन घ्या.                                                            १०० मिली नारळाच्या तेलात लिंबाच्या बिंयाचे चुर्ण(२०ग्रँम) चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.                        आठवड्यातून २ दिवस रात्री या तेलाने मालिश केल्यास डँड्रपची समस्या दुर होवू शकते.                              काळी माती केसांसाठी चांगली असते.काळी माती दोन तास पाण्यात कालवून ठेवा.नंतर डोक्यास ही माती लावा आणि थोड्या वेळाने डोके धुऊन घ्या कोंड्याची समस्या दूर व्हायला मदत होईल.

केसातला कोंडा कमी करण्यासाठी दही + अंडी+लिंबू+ बेसन यांच मिश्रण हा एक उत्तम लेप सिद्ध झाला आहे.सुकी त्वचा ही अल्कलाइन आहे.त्यावर हा लेप आम्ल क्रिया करतो आणि त्वचेला समतोल ठेवतो.                              त्रिफळा पावडर दह्यात भिजवून त्याचा लेपही एक उत्तम औषध म्हणून वापरण्यास काहीच हरकत नाही.