NC Times

NC Times

कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर दबाव तंत्र


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ (आबांण्णा माळी) -
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेलं जत तालुक्यातील उमदी हे संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते.
या पोलीस स्टेशनला एक सिंघम आधिकारी ची आवश्यकता होती आणि ती संदीप  शिंदे यांचे रुपाने भरून निघाली  आहे,शिंदे साहेब रुजू झाल्यापासून उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामध्ये भरपूर बदल झालेला आहे कर्नाटक सीमा जवळ असल्याने या भागामध्ये कर्नाटकची खाजगी सावकारकी  उमदी परिसरात जोरात चालू होती ती पूर्णपणे मोडित निघाली आहे  व गावगुंडांना खाकी  दहशत  निर्माण झाली आहे .
 एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची अल्पवधी काळात ओळख निर्माण झालेली आहे.
पूर्वी उमदी व आसपासच्या परिसरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत होते त्यामध्ये मटका, गांजा, हुबळीमेड दारू ,जुगार , चंदन तस्करी असे अनेक वाईट धंदे बंद केले आहेत
 त्याचबरोबर उमदी पोलीस ठाण्याच्या वतीने प्रथमच मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
गावातील रोडरोमिओ यांची योग्य ते बंदोबस्त करून गावातील कॉलेज तरुणी  आता मुक्तपणे संचार करतात.
गावातील महिलांसाठी उमदी पोलीस ठाण्याच्या वतीने वेळोवेळी कार्यक्रम घेण्यात येतात यामध्ये दसऱ्यामध्ये दांडियाचा खेळ,हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच महिलांसाठी साहसी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, खेळाडूसाठी क्रीडा स्पर्धेमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी स्पोर्ट्स चे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात.
पूर्वी गँगवार मोठ्या प्रमाणात चालत होते ते आता पूर्णपणे बंद झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात चेक पोस्ट येथे  पोलीस संचलन करण्यात आले आहे.
त्यामुळे उमदी पोलीस ठाण्याची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे चर्चा होताना दिसत आहे.
 उमदी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे डॅशिंग व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत सिंघम स्टाईलने कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करत असल्यामुळे काही समाजकंटकांना त्यांचा वशिला तिथे चालेना म्हणून त्यांच्यावर दबाव तंत्र आणून कटकारस्थान रचले जात आहे . 
जत तालुक्यातील पूर्व भागातील पत्रकार  व उमदी, जाडर-बोबलाद,माडग्याळ आणि आसपासच्या परिसरातील समाज बांधव त्यांच्या पाठीशी आहेत.
याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख यांना  निवेदन देऊन बदली न करण्याची मागणी केली आहे.