NC Times

NC Times

आमदार बच्चू कडू यांनी सुनील बागडे यांच्यावर सोपवली सांगली लोकसभेची जबाबदारी


नवचैतन्य टाईम्स जत(प्रतिनिधी)- प्रहार संघटनेचे    तालुकाध्यक्ष सुनील बागडे त्यांच्यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगली लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे. लोकसभेच्या निवडणुकीची  रणधुमाळी सुरू असून. प्रहार संघटनेने अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवार उभे केला आहे .अन्य ठिकाणी कोणाला पाठिंबा द्यायचा हा निर्णय अध्याप प्रलंबित ठेवला असून .त्यातच हातकणंगलेमध्ये शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना प्रहार संघटनेचे पाठिंबा दिला आहे. सांगली येथे कोणाला पाठिंबा द्यायचा त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांच्यावर सोपवली असून. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी सोमवारी सांगली जिल्ह्यातील सर्व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक  सांगली येथे बोलवली आहे .या बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा की महायुतीला पाठिंबा द्यायचा याची चर्चा करण्यात येणार असून. प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर बुधवारी प्रहार संघटना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. प्रहार संघटनेच्या भूमिकेकडे जिल्हायाचे लक्ष लागून राहिले असून .जिल्ह्यात प्रहार संघटनेला मानणारा मोठा वर्ग असून दिव्यांगासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात प्रहार संघटनेने काम केले आहे. प्रहार संघटनेची मते निर्णायक असून. प्रहार संघटना महाविकास आघाडीला पाठिंबा देणार की महायुतीला पाठिंबा देणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील व शिराळा प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष बंटी पाटील, यांच्यावर हातकणंगलेची जबाबदारी आमदार बच्चू कडू यांनी सोपवली आहे.