NC Times

NC Times

रहिमतपूर येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयात वेध या वार्षिक नियतकालिका अंकाचे प्रकाशन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी- (ह.भ.प.प्रा.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले)
  वेध ' चे प्रकाशन शैक्षणिक वर्ष-2022-23 पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित,सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय,रहिमतपूर ता.कोरेगाव, जि.सातारा 
(विद्याशाखा  :कला ,वाणिज्य ,विज्ञान व व्यवस्थापन)
नॅक पुनर्मूल्यांकन बी ++ मानांकन येथे 'वेध' या वार्षिक नियतकालिका अंकाचे  माजी विद्यार्थी  - विद्यार्थ्यींनींच्या शुभहस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला जुने ते सोने,नवे ते हवं ते ही स्वीकारावं,माजी विद्यार्थ्यांकडून आजी विद्यार्थ्यांना प्रेरणा व संदेश देणारे असे हे प्रकाशन करतानाचे क्षण ,मा.सौ.चित्रलेखा माने - कदम अध्यक्षा पंचक्रोशी शिक्षण मंडळ, रहिमतपूर माजी सदस्या : अधिसभा व व्यवस्थापन परिषद, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांचे मार्गदर्शनाने,तसेच स्व.डाॅ. वा.गो. उर्फ काकासाहेब परांजपे,स्व.सरदार पां.नि.उर्फ बाबासाहेब माने स्व.सरदार दादासाहेब माने स्व.श्रीमती प्रेमलता पांडुरंग माने स्व .श्रीमती स्नेहलता माने या सर्वांचे आशीर्वादाने ,प्राचार्या डाॅ. भाग्यश्री जाधव, यांच्या सहकार्याने,संपादक मंडळ प्रमुख प्रा.श्रीकांत बोधे,सहकारी प्रा. युवराज खरात,प्रा.डाॅ. सुनंदा मोहिते,प्रा. डाॅ. वैजयंती ओतारी, प्रा.डाॅ. गोरख बनसोडे, मुख्य लिपिक श्री.संजय पोळ, श्री.प्रथमेश निकम,यांच्या योगदानाने महाविद्यालयाच्या  विजयाच्या आलेखाने अशीच उंची गाठावी  व प्रत्येक विद्यार्थ्यी प्रत्येक क्षेत्रात यशाची उंच भरारी घेवून 'वेध'या वार्षिक नियतकालिके मध्ये वाचकांना ती संधी पुन्हा-पुन्हा लाभावी ,असेच सर्व विद्यार्थी  घडले व घडत आहेत ,घडत राहतील,"जीवनाच्या वाटेवर शिखर आहे यशाचे ,किती ही उंच असले तरी ते प्रयत्नांनी गाठायचे "अशी यशाची शिखरे सर करून जीवनाची समाजातील उंची वाढवणारे, शैक्षणिक वर्ष 1998 ते 2001 (F.Y,SY,T.Y ) महाविद्यालयीन शिक्षण  पूर्ण करणारे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, येथे काॅलेज चे नाव लौकिक करणारे,ग्वाल्हेर पर्यंत'राज्य स्तरीय युवा महोत्सवात 'नृत्य पोहचवणारे           ,व आज समाजातील विविध उल्लेखनीय क्षेत्रात  कार्यरत असणारे,तसेच समाजकार्य, राजकीय कार्य, आणि अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेणारे ,सर्व  माजी विद्यार्थी-विद्यार्थ्यींनी यांना पाहून व त्यांचे कार्य ऐकून,आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय,प्राचार्या. डाॅ सौ.भाग्यश्री जाधव ,आणि सर्व गुरूवर्य भारावून गेले . 
एखादी व्यक्ती जेंव्हा समाजात नावारुपाला येते तेंव्हा ते यश ,नावलौकिक त्याचे एकटाचे नसून त्यासाठी त्याचा परिवार व शिक्षक हे ग्राह्य धरले जातात.2024  चा 'गेट - टूगेदर' असाच यादगार ठरला. तो  फक्त विद्यार्थ्यांसाठी च नव्हेतर सर्व प्राध्यापक वृंद व इतर प्रशासकीय  वर्ग ही आनंदाने या  प्रकाशनाचे सोनेरी क्षण  आपल्या मोबाईल मध्ये टिपत होते.
एवढ्या वर्षानंतर भेटणाऱ्या  या सर्वांचे मन भरून आले,
पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या,क्षणार्धात स्मृतींना उजाळा मिळाला.या वेळी उपस्थित सर्व एकमेंकांचे धन्यवाद देत होते , कारण मध्यतंरी 'कोरोना ' सारखी जागतिक महामारी नंतर चे  हे भेटणे खरच च आल्हाददायक हा क्षण होता .
"जीवन  फुलपाखरा प्रमाणे स्वच्छंदी जगावे , मात्र जीवनाचे ध्येय हे मधमाशी सारखे असावे"हे सर्व विद्यार्थ्यी-विद्यार्थ्यीनींनी आचरणात आणून त्याची पोच पावती मिळावी ती ही अश्या स्वरूपात गेट -टूगेदर दिवशी सर्व आनंदित झाले.आम्हां विद्यार्थ्यांसाठी हा प्रकाशन सोहळा व त्यामध्ये दिलेला  हा 'वेध 'या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सृजनशील लेखनाचे आणि कलात्मक अविष्काराचे हक्काचे व्यासपीठ,जणू काही आमच्यासाठी पुरस्कारच आहे,"पुरस्काराने प्रेरणा मिळते, प्रेरणेने राष्ट्र घडते, राष्ट्र उद्धारासाठी  शिक्षण हे क्षेत्र   फार च महत्वाचे आहे.   
"इमारत बनायला वेळ लागत नाही, काॅलेज मध्ये विद्यार्थ्यी घडविण्यासाठी वेळ लागतो,कारण प्राध्यापक आणि विद्यार्थ्यी यांचा खराखुरा  मेळ लागतो."संस्था- प्राचार्या - प्राध्यापक -प्रशासकीय वृंद विद्यार्थ्यी -सर्वांचे योगदान तेवढेच लागते.या प्रसंगी उपस्थित मान्यवर, आदरणीय, सरदार बाबासाहेब माने   महाविद्यालयाच्या वंदनीय प्राचार्या. डाॅ.सौ.भाग्यश्री जाधव ,विद्यार्थ्यी-कलाक्षेत्रातील सिने तारका , तब्बल 50 पुरस्कार प्राप्त, संस्थापिका  'ऐश-रिया' नृत्य अकॅडमी  डोंबिवली.  सौ.स्मिता  भोसले-धुमाळ श्री. संतोष मांढरे जिल्हा  सरचिटणीस प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सातारा.प्रबोधनकार, प्रवचनकार, ह.भ.प.प्रा.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले.आदर्श गृहिणी पुरस्कार प्राप्त सौ. योगिता  माने-पवार,आदर्श शिक्षिका -सौ. मनिषा कांबळे-चोपडे, उद्योजिका-सौ.निर्मिला जाधव-भोसले. सुप्रसिद्ध ज्योतिषशास्त्रतज्ञ -श्री.प्रभू स्वामी.आधुनिक शेतकरी-श्री.अमर माने.या सर्वांचे आभार महाविद्यालयाच्या मराठी विभागातील  - आदरणीय वैराट सर , यांनी मानले.
तर माजी विद्यार्थी-विद्यार्थ्यीनी ना ही सर्व प्राध्यापक वृदांनी भावी आयुष्यासाठी अनेक शुभ आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या.खरचच 'वेध' नावाप्रमाणेच यामधील प्रत्येक वर्गातील,प्रत्येक विद्यार्थ्यी-विद्यार्थ्यीनीच्या पुढी भविष्यातील वाटांचा वेध लावत आहे.
कारण काळ हा परिवर्तनशील असतो,काळानुसार सर्व क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असतात, शिक्षण क्षेत्रात बदल होणे ही "गरजेचा काळ म्हणण्यापेक्षा काळाची गरज आहे "
सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षण जीवनाभिमुख          रोजगाराभिमुख,आणि कौशल्यांधिष्टित असणे अत्याआवश्यक आहे.या तूनच उद्याचा समृद्ध बलशाली भारत उभा राहिल असा आशावाद यामध्ये व्यक्त होत आहे.
  यावेळी विशेष उपस्थिती प्रा.श्रीकांत बोधे (प्रमुख संपादक)
प्रा.डाॅ.बनसोडे सर ,प्रा.संदे सर ,प्रा.सावंत सर व इतर प्राध्यापक ही उपस्थित होते.