NC Times

NC Times

आजपासून घाटनांद्रेत श्री भैरवनाथ देवाची यात्रेस प्रारंभ




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-आजपासून घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा सुरू होणार असून,यात्रेनिमित्त विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.तरी यांचा भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.
आज रात्री नऊ वाजता वाघ्यामुरळ्याचा कार्यक्रमाला सुरुवात होणार असून,पहाटे पाच वाजता देवाच्या लग्नाचा कार्यक्रम पार पडणार आहे.तर मंगळवारी दुपारी तीन वाजता सुवाद्यासह गावातील प्रमुख मार्गावरून पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.सदर पालखी संपूर्ण गावात फिरून नंतर पुन्हा श्री भैरवनाथ मंदिरात येणार आहे.येथे सौभाग्यवती स्त्रियांचा एकमेकींना वाण वाटण्याचा कार्यक्रम होणार आहे तर तदनंतर आंबिलसह प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.याचा लाभ खेळणीवाले,पाळणेवाले,मिठाईवालेसह व्यापारीवर्गांनी घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.