NC Times

NC Times

घाटनांद्रेत आज हाजरत पिरसाहेब उरुस


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-महाराष्ट्र व कर्नाटक येथील  बऱ्याच भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणारे व तेही एकत्रीत तीन मदार असणारे एकमेव अश्या घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील हाजरत पिरसाहेब दर्ग्याचा उरुस आज भरणार असुन यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सदर उरुसा निमित्ताने गंध व गलेप चढवणेसह चादर अर्पण करण्यात येणार आहे.तर कार्यक्रमाची सांगता ही महाप्रसाद वाटपाने करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक शफीक मुलाणी,अकबर मुलाणी,साहील मुलाणी,असद मुलाणी व आयन मुलाणी यांनी दिली.