NC Times

NC Times

बारामतीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणाऱ्यांना धमकावलं जातंय -रोहित पवार


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे) 'मलिदा' गँगचा धमकीचा व्हाट्सअप कॉल आला तर त्याला सांगा कृपा करून व्हाट्सअप कॉल करू नका. साधा कॉल करा. इथे नेटवर्क खराब आहे आणि साध्या कॉलवर फोन आला की तो रेकॉर्ड करा. तो रेकॉर्ड झालेला कॉल फक्त आमच्याकडे पाठवा. त्याचं आम्ही काय करायचं ते बघतो, असं म्हणत आमदार रोहित पवारांनी फोनवरून धमकी देणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. आमदार रोहित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. तालुक्यात विविध ठिकाणी त्यांच्या आज सभा पार पडणार आहेत.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, घरी धमकवायला कोणी आलं.. तर तुम्ही हुशार आहात, काय करायचे ते तुम्हाला माहिती आहे. जो रेकॉर्ड केलेला व्हिडीओ आहे तो असा वाजवायचा की ते पुढे आलेच नाही पाहिजे. कारण पुढे जाऊन 'मलिदा' गॅंगला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका लढवायच्या आहेत. म्हणून धमकी देऊन देऊन कोण कुणाचं नाव खराब करतंय.. स्वतःचंच ना..? उद्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये नवीन कार्यकर्ते आपण उभे करू. नवीन लोकांना संधी देऊन नवीन चेहरे पुढे येतील. स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक लोकांना संधी देऊ शकतो. त्यामुळे 'मलिदा'गॅंग चे जास्त टेन्शन घेऊ नका, असं म्हणत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
 मलिदा गँग धमकावत असल्याचा आरोप
बारामतीतील 'मलिदा' गॅंगचे कॉन्ट्रॅक्टर एक एक कोटीच्या गाडीत फिरतात. कॉन्ट्रॅक्टर कोण कोण आहेत हे तुम्ही बघा.. याचा अभ्यास तुम्हीच करा.. हे 'मलिदा' गॅंगवालेच तुम्हाला धमकावत आहेत. हेच लोक तुम्हाला धमकावत आहेत. त्यांना सामान्यांचे काही पडलेलं नाही त्यांच्या स्वार्थासाठी ते धमकावत आहे, असा हल्लाबोलही रोहित पवारांनी केला.
  गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही निशाणा
महाविकास आघाडीच्या काळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलं. यावेळेस एक माणूस कोर्टात गेला. मी त्याचं नाव विसरलो काय त्याचं नाव... गाढविणीचं दूध पिणारा... असं म्हणत रोहित पवारांनी गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा साधला. पुढे बोलताना पवार म्हणाले की, मला त्यांच्या शेजाऱ्यांचा फोन आला. सदावर्तेनी त्यांच्या फ्लॅटमध्ये गाढवीन आणून ठेवली आहे. मला टीव्हीवर कळलं की ते गाढविणीचं दूध पितात, अशी खिल्लीही रोहित पवार यांनी उडवली.