NC Times

NC Times

कुपवाड येथे इनस्पायर ॲवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स वाई (सरस्वती वाशिवले)-  कुपवाड येथे जिल्हास्तरीय'इनस्पायर ॲवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 
आनंदाने ,उत्साहाने ,जल्लोषात पार पडले.
दि.३,४,५ या रोजी एप्रिल महिन्यात उत्साहात भरले ले 'इनस्पायर ॲवार्ड 'जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०२२-२३चे विज्ञान प्रदर्शन म्हणजे विज्ञान जत्राच होय.
चैत्र महिन्यातील वसंत ॠतुच्या आगमनाने सृष्टीसही आनंद होतो .तसाच गेले तीन दिवसीय या विज्ञान प्रदर्शनामध्ये २७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .

यामध्ये सांगली व सातारा या दोन जिल्ह्यातील अनेक नव संशोधक, नव वैज्ञानिक सहभागी होते. यामधील वाई तालुक्यातील दोन शाळेमधील उपकराणांची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन साठी झाली.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ज्ञानदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी आपले मनोगत व्यक्त केले. व नव निर्मिती करणारे सर्व विद्यार्थ्यी व मार्गदर्शक शिक्षक तसेच पालक यांचे ही आभार मानले व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या.