NC Times

NC Times

शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एक एफआयआर दाखल

 
नवचैतन्य  टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-मुंबईमधून महाविकास आघाडीसाठी एक धक्कादायक बातमी येत असून साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी देखील शिंदे यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा करण्याचा इशारा दिला आहे. 
कोरेगावमधील आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी आरोप केले आहेत. उदयनराजेंनेही हा मुद्दा उचलून धरला आहे. एपीएमसी मध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे ६५ कोटींचे नुकसान केल्याचा आरोप शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे. 
या प्रकरणी नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात शिंदे यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. तर शिंदे यांनी या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळविला होता. हे प्रकरण २००९ चे आहे. २००९ मध्ये मसाला मार्केटच्या ४६६ गाळेधारकांना अधिकचे बांधकाम करण्यासाठी ६०० रुपये चौरस फुटाने परवानगी देण्यात आली होती. यावेळी रेडीरेकनरचा ३०६६ रुपये दर होता. यामुळे एपीएमसी प्रशासनाची ६५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 फळ मार्केट शौचालय टेंडर घोटाळ्यात शिंदे यांना आधीच जामीन मंजूर आहे. तर उर्वरित संचालकांना अटक करण्यात आली होती. आताच्या नव्या घोटाळ्यात गुन्हा दाखल होत नव्हता. शौचालय टेंडर घोटाळ्यात दोन महिन्यांपूर्वीच शिंदेना जामीन मिळाला आहे. तर संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली होती.