NC Times

NC Times

घाटमाथ्यावर हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्या  वरील घाटनांद्रे,तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,        कुंडलापुर,जाखापुर व कुची परिसरात श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सदर परिसरात अगदी भल्या पहाटे पासूनच या कार्यक्रमाची लगबग दिसून येत होती.भजन, किर्तन, प्रतिमा पुजन,पाळणा  पुष्पवृष्टी व  महाप्रसाद वाटप यासारखे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम यानिमित्ताने पार पडले.
घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ)  येथील श्री हनुमान मंदीराच्या प्रांगणात श्री हनुमान जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.येथे अगदी पहाटे पासूनच सदर कार्यक्रमाची लगबग दिसून येत होती.भजन,प्रतिमा पुजन व आरती करून‌ पुष्पवृष्टी करण्यात आली.तर सकाळी सातच्या दरम्यान पाळणा म्हणून श्री हनुमान जन्मोत्सव पार पडला.तदनंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.