NC Times

NC Times

उच्च तापमानामुळे उष्णतेशी संबंधित आजार; डोळ्यांच्या समस्यांत वाढ


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)- शहरातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्णतेशी संबंधित आजारांचा सामना करावा लागत असतानाच आता उन्हामुळे डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. उन्हाळामुळे डोळे लाल होणे, दुखणे, आग होणे या प्रकारचा त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. तापमानात वाढ झाल्याने डोळे कोरडे पडत असून, त्यामुळे डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञांनी नोंदविले.
डोळ्यांना त्रास होण्याचे रुग्ण मार्चपासून वाढले आहे. उन्हात फिरणाऱ्यांमध्ये या प्रकारच्या समस्या आढळून येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे उन्हात फिरताना आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पंखे, वातानुकूलित यंत्रेणेचा (एसी) वापर जास्त प्रमाणात केला जातो. एसी आणि पंख्यामध्ये जास्त वेळ बसल्याने डोळ्यांमधील पाणी शोषले जाते. त्यामुळे डोळे कोरडे होतात. कोरडेपणामुळे डोळ्यांना लवकर थकवा 
डोळ्यांचा त्रास होण्याची कारणे
डोळे अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे उष्णतेचा डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. उष्ण हवेमुळे डोळ्यांवर परिणाम होतो. उष्ण हवा, हवेतील धूळ आणि प्रदूषणामुळेही डोळ्यांना त्रास होतो. उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर केला जातो; परंतु गॉगलच्या काचा दर्जेदार नसल्यास त्याचा परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आणि पोहताना योग्य प्रकारच्या काचा असलेल्या गॉगलचा वापर करावा, असेही नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
काय काळजी घ्यावी?
- बाहेर जाताना छत्री, काळा चष्मा वापरावा.
- डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.
- पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
- डोळे कोरडे पडल्यास औषधे घ्यावीत.
तापमान वाढल्याने डोळे कोरडे होतात. कोरडेपणामुळे डोळे चुरचुरणे, लाल होणे, दुखणे, किंवा पाणी येणे या प्रकारचा त्रास होतो. उन्हाळ्यात या प्रकारचा त्रास होत असतो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.