NC Times

NC Times

कराड येथील रेणुका नगर मिलिंद सोसायटी मध्ये आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी(ॲड.पंडित गायकवाड)
सैदापूर तालुका कराड येथील रेणुका नगर मिलिंद सोसायटी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वी जयंती निमित्त परिसरातील शेकडो महिला व आबालवृद्ध नागरिकांनी संविधान शिल्पकाराच्या विचारांच्या जागर केला .
सैदापूर येथील रेणुका नगर तसेच मिलिंद गृहनिर्माण संस्थेच्या संयुक्त रीतीने साजरा झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना आपण देशाचे नागरिक म्हणून जबाबदारी सांभाळताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आचार विचार डोळ्यासमोर ठेवावयास हवे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास निवृत्त नायब तहसीलदार श्री. आर. व्ही. पाटणकर, प्रा. डॉ. आर. ए. केंगार सर, श्री. संदीप ठोंबरे ग्रामपंचायत सदस्य सैदापूर , प्रा. बी. बी. काश्यप सर, प्रा. सी. वाय. कांबळे सर , प्रा. डी. व्ही. जाधव सर तसेच निवृत्त प्राचार्य श्री. बी. एन. कालेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी श्री आर व्ही पाटणकर यांनी उदबोधक भाषण करून डॉ. आंबेडकरांचे महिला विषयक काम किती महत्त्वाचे आहे आणि त्यांच्या क्रांतिकारी हिंदू कोड बिल मुळे देशातील करोडो महिला किती सक्षम होऊ शकल्या याचे मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. आर. ए . केंगार सरांनी कवितेतून डॉक्टर आंबेडकरांचे व्यक्तित्व किती उत्तुंग होते ते मांडण्याचा तसेच अल्पायुष्यात डॉ. आंबेडकर यांनी किती दूरगामी परिणाम करणारे कार्य केले याचा उल्लेख केला प्राचार्य कालेकर सरांनी डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्व किती गोष्टी शिकण्यासारखे आहेत हे सांगतानाच डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकारणे दैनंदिन जीवनात किती महत्त्वाचे आहे त्यातून समाज कसा समृद्ध होऊ शकतो याचे महत्त्व विशद केले . कुमारी नारायणी कांबळे यांनीही आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपले ऋण व्यक्त केले.
डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून श्री. शशिकांत कीर्तने कार्याध्यक्ष म्हणून श्री. सुमित लादे यांनी तर सचिव म्हणून ॲड. पंडीत गायकवाड यांनी खजिनदार म्हणून श्री. शैलेंद्र कांबळे यांनी जबाबदारी पार पडली कार्यक्रमास बौद्धाचार्य म्हणून श्री. कैलास कांबळे यांनी जबाबदारी सांभाळताना बोधिसत्व डॉ. आंबेडकरांच्या धम्म कार्याबद्दल अमूल्य माहिती दिली.