NC Times

NC Times

दारूच्या नशेत गार्डनमध्ये झोपला तेवढ्यात डोकं अडकलं बाकात

 
दारू पिणं हे शरीरासाठी हानीकारक आहे. दारूमुळे विविध प्रकारचे आजार होतात. माणसाचं आयुष्य कमी होतं. मात्र हे माहित असताना देशील देशभरातील लाखो लोक दररोज दारूचं व्यसन करतात. अशाच एक मद्यपीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्यक्ती दारूच्या नशेत बागेतील एका बाकड्यावर झोपला होता. पण जोपेत त्याचं डोकं या बाकामध्ये अडकलं. अन् त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून पार पोलीस देखील हैराण झाले आहेत. या मद्यपीचं रेस्क्यु ऑपरेशन सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्याचं डोकं बाहेर काढण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

 ही घटना कानपूरमध्ये घडली आहे. रात्री १ च्या सुमारास राम लीला पार्कमध्ये एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत बाकावर झोपला होता. दरम्यान झोपेतच तो बाकावरून खाली पडला. पण पडता पडता त्याचं डोकं बाकामध्ये अडकलं. त्याचं धड खाली राहिलं आणि डोकं वर बाकामध्ये अडकलं होतं. तो स्वत:ला बाहेर काढण्यासाठी जीवतोड प्रयत्न करत होता पण काही केल्या त्याचं शरीर बाहेरच येईना. दरम्यान ही घटना बागेतील इतर लोकांनी पाहिली. आणि त्याच्या मदतीसाठी पोलिसांना बोलावलं. पोलीस देखील बराच वेळ प्रयत्न करत होते शेवटी त्यांनी कसंबसं त्याला बाहेर काढलं. या रेस्क्यु ऑपरेशनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
 ​मद्यपीला कोणी काढलं बाहेर?

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार नागरीकांनी बोलावताच प्रभारी बेनाझबार उपनिरीक्षक कविंद्र खटाना, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक आणि हवालदार चित्रा कुमार यांनी तात्काळ उद्यानात पोहोचून या व्यक्तीची मदत केली. त्यांनी अत्यंत सावधगीरीनं त्याचं डोकं बाकामधून बाहेर काढलं. हा व्हिडीओ २५ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून सर्वानी या पोलिसांचं कौतुक केलं आहे. तसेच या मद्यपीवर कारवाई करण्याची मागणी देखील काही जण कराताना दिसत आहेत.