NC Times

NC Times

जाडी कमी करण्यासाठी उपाय....


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- पुढील उपायाने जाडी कमी व्हायला मदत होते. हे उपाय दररोज सातत्याने करणे आवश्यक आहे यातील पहिले तीन उपाय आवश्यक. नंतरचा कोणताही किमान एक करावा. सर्व उपाय केल्यास झटपट फायदा होतो. जाडी ही एक दोन महिन्यात कमी होत नाही. वेळ लागतो. सातत्य महत्वाचे आहे.                                                       (१) आपण जेवताना नीट लक्ष देऊन बघितल्यास आपण घास फक्त पाच -सहा वेळाच चावतो  हे चुकीचे आहे .जेवताना किंवा खाताना प्रत्येक घास मोजून कमीत कमी 20 वेळा तरी (समर्थ रामदासांनी सांगितले आहे की 32 वेळा) चावून मगच मिळावा. काहीही पण प्रत्येक घास किमान 20 वेळा तरी चावणे अत्यावश्यक आहे.( नॉनव्हेजसाठी प्रत्येघास 64 वेळा चावणे गरजेचे आहे). हे जाडी कमी झाल्यानंतर ही कायमस्वरूपी चालू ठेवावे म्हणजे पुन्हा जाडी वाढणार नाही.                                  (२)- रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी अनुशापोटी एक चमचा साजूक तूप (गाईचे अथवा म्हशीचे चालेल. घरी केलेले किंवा  विकतचे चालेल) आणि एक चमचा साखर कालवून खायचे (मधुमेह असल्यास साखर खाऊ नये) आणि लगेच एक कप कोमट पाणी प्यायचे हे महत्त्वाचे (साजूक तुपाने जाडी वाढत नाही तर तर वनस्पती तुपाने जाडी वाढते). हे जाडी कमी झाल्यानंतरही कायमस्वरूपी चालू ठेवावे म्हणजे पुन्हा जाडी वाढणार नाही.                    (३) - सूर्य मुद्रा म्हणजे करंगळी शेजारील बोट (अनामिका) दुमडून अंगठ्याच्या बुंध्याला लावणे व अनामिकेवर अंगठा ठेवणे म्हणजे सूर्यमुद्रा ही मुद्रा दोन्ही हातानी केल्यास उत्तमच पण एक हात रिकामा असल्यास त्यानेही करावी ही मुद्रा जास्तीत जास्त वेळ करावी जेव्हा हात मोकळा असेल तेव्हा करावी चालताना, प्रवासात, टीव्ही पाहताना जरूर करावी. जाडी कमी झाल्यावर हे थांबवावे.                        (४) - रोज पाच ते बारा सूर्यनमस्कार घालावेत. हे जाडी कमी झाल्यानंतरही कायमस्वरूपी चालू ठेवावे म्हणजे पुन्हा जाडी वाढणार नाही.                                              (५)- शिवांबू म्हणजे स्वमुत्र पिणे. अर्धा ग्लास शिवांबू व अर्धा ग्लास पाणी एकत्र करून पिणे. दररोज सकाळी एक ग्लास, दुपारी एक ग्लास व रात्री एक ग्लास पिणे आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एकदा आठ दिवसाचे शिळे शिवांबू (एक वाटी) सर्वांगाला जिरवावे. हे जाडी कमी झाल्यानंतरही कायमस्वरूपी चालू ठेवावे म्हणजे पुन्हा जाडी वाढणार नाही. 

 (६)-  जेवण झाल्यानंतर हात धुवायच्याही आधी अर्धा लिंबू भांडे भर पाण्यात पिळून ते पाणी प्यावे हे दोन्ही जेवणानंतर करावे. जाडी कमी झाल्यावर हे थांबवावे.                      (७) बंद खोलीत अंधार करून उघड्या अंगावर निळ्या रंगाचा प्रकाश एक तास टाकावा. दिवा एक फूट अंतरावर असावा. जाडी कमी झाल्यावर हे थांबवावे.                वरील उपचार सातत्याने किमान सहा महिने करावेत. जेवताना प्रत्येक घास किमान 20 वेळा चावून खाणे, साजूक तूप साखर खाऊन कोमट पाणी पिणे कायमस्वरूपी चालू ठेवावे म्हणजे पुन्हा जाडी वाढणार नाही. सहा महिन्यात जाडी कमी न झाल्यास आपण वरील प्रयोग सातत्याने केले का? हे तपासावे
.