NC Times

NC Times

जुई गडकरीचं खऱ्या आयुष्यात काय सुरू आहे? नेटकऱ्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन) -छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने आपल्या वागण्याने आणि आवाजाने चाहत्यांना भुरळ घातली. तिची 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेले वर्षभर ही मालिका प्रथम क्रमांकावर आहे. प्रेक्षकांचाही या मालिकेला भरभरून प्रतिसाद लाभला आहे. तिचं सायलीचं पात्र सध्या प्रचंड गाजतंय. तशीच तिची 'पुढचं पाऊल' ही मालिकादेखील प्रचंड चालली होती. जुई सोशल मीडियावर सक्रीय असते. ती कायमच तिचे फोटो आणि सेटवरील व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता चाहत्याने विचारलेल्या अतरंगी प्रश्नाला तिने तसंच उत्तर दिलं आहे. तुझं खऱ्या आयुष्यात अफेअर सुरू आहे का असा प्रश्न एका चाहत्याने तिला विचारला होता.
 जुईने नुकतंच सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंगचं सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये जुई चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असते. आताही तिने अशाच काही निवडक प्रश्नांना उत्तरं दिली. या सेशन दरम्यान एका चाहत्याने तिला विचारलं की तू तुझ्या आयुष्यात एवढी पॉझिटिव्ह कशी राहते? त्यावर उत्तर देताना जुई म्हणाली, 'काही मॅनेज वगरे करत नाही. माझ्या आयुष्यात देखील अशी नकारात्मकता येत असते. पण मी एक ठरवलेलं आहे की चॉइस आपली असते आणि मी सकारात्मकता निवडते. आपल्या मनामध्ये वाईट विचार आले की आपण आणखी विचार करत जातो. मी ते नाही करत. त्यांना टिकू देत नाही. आपण चांगलाच विचार करायचाय हे मी स्वतःला सांगितलं आहे.' तर यासोबतच एका चाहत्याने तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारला होता. तू सिंगल आहेस की तुझं अफेअर चालू आहे? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता.
 या प्रश्नाला उत्तर देत जुई म्हणाली, 'माझं अफेअर वगरे काहीही सुरू नाहीये.' हे ती अतिशय मजेशीर पद्धतीने बोलली आहे. कारण प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने अफेअरची स्पेलिंग चुकीची लिहिली आहे. एका नेटकऱ्याने तिला मालिकेतील ट्विस्टबद्दलही विचारलं आहे. यावेळेसही तिने येत्या भागात एक महत्वाचा ट्विस्ट येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तिने चाहत्यांना मालिका न चुकता पाहण्याची विनंती केली आहे.