NC Times

NC Times

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा नव्या घरात सहकुटुंब गृहप्रवेश


नवचैतन्य  टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-२०२४ हे नववर्ष सुरू झाल्यापासून आणि अलीकडेच गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षाचे स्वागत करताना अनेक सेलिब्रिटींनी नवीकोरी गाडी, नवीन घर खरेदी केले. आता या यादीमध्ये आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. मराठी टीव्ही विश्वात या अभिनेत्रीने मोठे नाव कमावले आहे, शिवाय ती सामाजिक कार्यातही नेहमी पुढाकार घेते. 'आई कुठे काय करते' या मालिकेत ही
 एकेकेके फेम ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून अश्विनी महांगडे आहे. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न तिने पूर्ण केले असून या स्वप्नातील घराचा व्हिडिओ तिने अलीकडेच शेअर केला. अश्विनीने तिच्या नव्या घरात रीतसर पूजा करुन गृहप्रवेश केला. यावेळी तिच्या घरातील सर्वच मंडळींसह होणारा नवराही उपस्थित होता. अभिनेत्रीने फोटोही शेअर करत तिच्या घराची झलकही दाखवली.
या फोटोमध्ये दिसते आहे की महांगडे कुटुंबाने स्वामी समर्थ, गणपती बाप्पा यांची पूजा केली. गृहप्रवेशाचे विधी करताना दाराला तोरण बांधलेले आहे, घरातील चूल, केरसुणी यांची पूजाही केली. काही महिन्यांपूर्वी अश्विनीने या नव्या घराच्या किल्लीचा फोटो शेअर केलेला. जानेवारी महिन्यात ही आनंदाची दिल्यानंतर आता तिने सहकुटुंब या घरात प्रवेश केला आहे. या फोटोत अश्विनी आणि तिचा होणारा नवरा निलेश जगदाळेदेखील पूजाविधी करताना दिसले.
आमच्या सगळ्यांचे घर. माझ्या माणसांमुळे घराला घरपण आहे', असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केला. यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर अश्विनीचे चाहते तिचं कौतुक करत आहेत.
दरम्यान अश्विनी 'आई कुठे काय करते' मालिकेत अनघा देशमुख ही भूमिका साकारते आहे. अरुंधती (मधुराणी गोखले प्रभुलकर) आणि अनघा यांच्यातील बाँडिंग प्रेक्षकांना विशेष आवडते. लवकरच ती मोठ्या पडद्यावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही भूमिकादेखील साकारणार आहे. याशिवाय ती 'रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान' या संस्थेची सक्रिय कार्यकर्ती देखील आहे.