NC Times

NC Times

गुराखी हा कथासंग्रह ग्राम जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन-डॉ.पंडित टापरे



प्रा. संभाजी लावंड यांचा "गुराखी" हा कथासंग्रह ग्राम जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन घडवतो. "कलंक" सारख्या कथेचा अपवाद सोडला तर या कथा संग्रहातील सर्व कथा नायकाच्या बालपणीच्या आहेत. सातारा जिल्ह्या तील खटाव तालुक्यातील खातगुण हे नायकाचे गाव. हा नायक व त्याचे बालसवंगडी यांना येरळा नदी गावा भोवतीचे डोह, गावा भोवतीचे जंगल हे सारे खेळण्यासाठी,आनंद लुटण्या साठी उपलब्ध आहे.पहिल्याच"गुराखी" या कथेत नायक जंगलात चुकलेली आपली गुरे हुडकण्यासाठी भटकतो. त्यात त्याला निसर्गाचे रंम्यआणि रौद्र रुप पाहवयास मिळते.शेवटी निवांत पणे डोहात पोहत असलेली गुरे नायकाला दिसतात व त्यांना घेऊन तो घरी येतो. बालपणात नायकावर शाळेत उत्तम संस्कार होत होते. प्राथमिक शाळेचे श्री जोशी हेडमास्तर होते. ते कडक शिस्तशीर. पुसेगावहून सायकलीवर यायचे. ते बरोबर आकरा वाजता येत. शाळेच्या फाटकाबाहेर विद्यार्थी शिक्षकांचा घोळका थांबलेला. श्री जोशी फाटकाचे कुलूप उघडत. मग शाळेचे कामकाज सुरु व्हायचे. एके दिवशी रस्त्यात त्यांची सायकल पंक्चर झाली. त्यामुळे शाळेत यायला त्यांना पाच मिनिटे उशीर झाला. त्यांनी त्या दिवशी रजा काढली. आज आपण हेड मास्तर नाही. ऑफिसच्या बाहेर बसून कामकाज केले. हा आदर्श नायक व त्याच्या शाळेतील मुलांपुढे होता. या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजेअनेक ठिकाणी निसर्ग रम्य वर्णने येतात. निसर्गावर मानवी भावभावनांचा आरोप केल्यामुळे तो निसर्गआपणा पुढे साक्षात ऊभा राहतो. जसे-तोंडावर आलेल्या प्रचंड ढगांची गर्दी हाताने बाजूला सारून सूर्यदेवाचा रथ भर दिवसा बारा वाजता मळवीतल्या डोहात स्वतःचे प्रतिबिंब पहात
आकाश मार्गे निघाला होता.
श्रीरामओढा व येरळा नदीचे पात्र तलवारीच्या पात्या सारखे उन्हात लांबवर लखलखत होते (पृ.क्र.१५) पात्रातील खोल डोह गंभीर वाटत होते.
त्याकाळी ग्रामजीवनात मनोरंजनाची साधने कमी होती. साऱ्या भावंडा बरोबर यात्रेचा आनंद तर लुटायचा.
पण यात्रेतील पाळणे, खेळणी, खाऊ या साऱ्या गोष्टीसाठी कुटुंबाकडे पैसे तरी हवेत. अशावेळी दादा शेतातील बाटुक उपटत. त्यांच्या मोळ्या बांधत. त्या मोळ्या दादा,यमुना,प्रभा,मंगल व नायक यांना डोक्यावर नेता येईल अशा बांधत. गावापासून चार किलो मीटर असणाऱ्या पुसेगाव जात. त्या मोळ्या विकून आलेल्या पैशात यात्रा साजरी होत असे. त्या काळी गावात मजुर शेतकरी यांच्यात शोषित -शोषक नाते नव्हते. "उपटणी"या कथेत ज्वारी
द्वारे गावचे लोकशिक्षण होत होते.                    नायकाच्या कपाळावर आदळला. रक्ताची धार लागली. नायकाच्या रडण्याला दादाने मार देऊन तर आईने जखमेवर हळद लावून प्रतिसाद दिला. या कथा संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदू -मुस्लिम संस्कृतीचे ऐक्याचे मनो हारी दर्शन अनिल, सुनील, दिलावर, इकबाल इ. मित्रा बरोबर नायकाने खेळणे व अभ्यास करणे, शेजारच्या खातुम आपाच्या बुबुने संभाला रातां धळेपणा झाल्याचे सांगणे व आईच्या सांगण्या नुसार नायकाने सुमी माळीन व राधा दळवीन यांच्या बरोबर हवा भाभी व हालिम भाभी यांच्या घरी भिक्षा मागणे, पीराच्या मंदिरात संदल च्या दिवशी अवघ्या पंचक्रोशीने हिरवे झेंडे व पालखीचे दर्शन घेणे, मुजावर आळीतील दोन्ही समाजांनी मिळुन मिसळून राहाणे, नायक व त्याच्या मित्रांनी तोडकरच्या रानातील व मुलांणकीतील जांभळे खाणे यातून हे ऐक्य साक्षात होते.येथे नायक व मुळकाची म्हातारी यांच्या प्रेमाचे हृद्य दर्शनघडते. "उचापती" या कथेत नायक जीजीच्या घरात संतोषी मातेचे पुस्तक वाचून दाखवत होता. मुळकाची म्हातारी जळणाचा बिंडा डोक्यावर घेऊन येत होती. तिला दगडी कठडा चढून घरी जायचे होते.नायकाने तिला हाताचा आधार देऊन दगडी कठडा चढून जाण्यास मदत केली.तिचे जळणही घरपोच केले. म्हातारीचे हृदय भरुन आले. तिने नायकालाउडदाच्या पीठाचे दोन लाडू खायला दिले. नि:शब्दपणे व्यक्त झालेले हे माणुसकीचे दर्शन घडवणारे प्रेम अगदी सहजपणे शब्दबद्ध होते. नायक खोड कर आहे. त्याने जोशी हेडमास्तरांचा चष्मा चोरला. संध्याकाळी कंदिलाच्या उजेडात अभ्यास करताना प्रभावती या थोरल्या बहिणीने पाहिला. नायकाला मार बसू नये म्हणून गोड बोलून तिने तो नायका कडून घेतला व उकिरड्या वर मला चष्मा सापडला असे म्हणून जोशी हेडमास्तरांकडे परत केला. त्यांनी एक रुपया बहिणी बक्षीस दिला. त्यातील आठ आणे नायकाने भांडून घेतले. थोरल्या भावाचा घरातील पैशाचा डबा नायका च्या लक्षात आला.त्यातून थोडे थोडे पैसे काढून बुढ्ढीचे बाल व इतर खाऊ खाण्यास नायकाने सुरवात केली. घरच्यांच्या हे लक्षात आले. दादांनी नायकाला भिंतीवरच्या खुंटीवर उलटे लटकावले. शेजारची गुणाताय सहज म्हणून नायकाच्या घरी आली होती. तिने दादांची मनधरणी केली. पुन्हा चोरी करणार नाही असे कबुल केल्या वर नायकाची सुटका झाली. या कबुली मुळे नायकाच्या आईला बरे वाटले. घरातील सहा भावंडात नायक शेंड फळ . त्यामुळे त्याचे लाड ही खूप झाले. तसा त्याने त्याच्या वागण्याने मार ही खूप खाल्ला. या ग्रामजीवनावर भूतांखेतांचे वर्चस्व मोठे असते. "भुतावळ" या कथेत लाल गोंड्याची टकुची घातलेली लहान भुते दिसतात. त्यांचा त्रास, काही ग्रामस्थांंचे झालेले मृत्यू याचे हृदयद्रावक वर्णन येते. नाय काला व त्यांच्या मित्रांना पुस्तकाचे खूप प्रेम आहे. नवीन पुस्तके आली की, त्यांच्या वासाने, त्यातील रंगीबेरंगी चित्रांनी सारी मित्र मंडळी आनंदी होत. बाटलीच्या काजळी धरलेल्या दिव्यावर अभ्यास करताना त्यांना त्रास होई.पण नंतर दादांनी कंदिल आणल्यावर त्यांचा अभ्यास उत्तम झाला. या कथा संग्रहात पुसे गावच्या सेवागिरी महाराजांचा प्रभाव साऱ्या गावावर पडलेला जाणवतो. दादा सहीत गावातील अनेक जाणती माणसे महाराजांचे शिष्य होते. त्यांच्या उपदेशामुळे ही मंडळी अतिशय नितीमान व माणुसकीचे जीवन जगत होती. महाराज ही भक्तांच्या हाकेला ओ देत होते. प्रमाने हुरडा खाण्यास बोलावल्या नंतर आपल्या हातातील हुरडा महाराज प्रसाद म्हणून भक्तांना देत. महाराज हुरड्याचा आनंद लुटत. गावच्या तुकाराम पहिलवानाला जिवंत केल्याची कथा साऱ्या पंचक्रोशीत गाजत होती. महाराजांच्या भक्तीने गावाची सांस्कृतिक उंची वाढलेली होती.गावचा ग्रामीण गोडवा वाखा णण्याजोगा होता. गावात आपुलकी होती. शेतकरी व बलुतेदार यांच्यात प्रेमभाव होता. माणसे कष्टाळू होती. यात्रेत जशी माणसे संगित बारीत रंगून जायची. तशी श्रीराम मंदिरात रघु तात्यांच्या ग्रंथ वाचनात गुंगुन जायची. गावातील सण, उत्सव, विवाह समारंभ साऱ्यात एकोपा होता. नायक म्हणतो, "गावची अत्यंत प्रामाणिक माणसे पाहून निसर्ग सुध्दा गहिवरून जात होता. (पृ.९२).
असे असले तरी तिन्ही त्रिकाळ ही आपुलकी रहात नव्हती. नायकाच्या धाकट्या बहिणीच्या मंगलच्या लग्नात भावकीने दुष्टावा केला. पाहुण्यांचा जानवसा ऐन वेळी घालवला. मध्यरात्री मंडपाचे कळक उपटले. पण दादांनी सारे जावयाच्या मदतीने सावरले.आणि शाप वाणी उच्चारली. त्याचे फळ दुष्टावा करणाऱ्या भावकि तील माणसांना त्यांच्या म्हातारपणी मिळाले. गाव गावा भोवतीची शेती निसर्ग या साऱ्यात नायक रंगून गेलेला आहे. नायकाला केळी आंब्याया मधुर आठवणी येतात. वारंगुळा करुन शेतकरी एकमेकाच्या कामाचा निप टारा कसा करतात याचे वर्णन येते. नांगरट करताना गोरख माने हा शेत करी बैलांना चुचकारायचा यातुन त्या शेतकऱ्याला आपल्या श्रमा बरोबर बैलांच्या श्रमालाही दाद द्यायचीअसे. निसर्ग, मानव आणि पशु वैभव यांची एक संगतीच या साऱ्या वर्णनातून आकाराला येते. नायकाचे कुटुंब अतोनात श्रम करत होते. धन्याच्या पेंड्या दगडावर आपटणे, पायांनी चोळणे, त्यामुळे दादा घामाघूम होत. दादा शेतावर घामाचा अभिषेक करीत ही शेतीची पुजा अविस्मरणीय आहे. नायकाच्या ठिकाणी कृतज्ञता आहे. आपल्या प्रगतीचा विचार करताना नायकाला आईवडिलांचे कष्ट आठ वतात. पक्ष पंधरवड्यात पूजेच्या ताटा पुढे नमस्कार करताना कृतज्ञतेने नाय काचे डोळे पाणवतात. या ग्राम विश्वाला कधी दुष्काळाचा ही सामना करावा लागतो. पाण्याचे नियो जन करणे, एकमेकांना संभाळुन घेणे, पाझर तलावाची कामे, रस्त्याची कामे, यातुन गाव दुष्काळातून सावरला. नाय काचे सुक्ष्म निरीक्षण आहे. पावसाळ्यात आई आणि तिच्या मैत्रिणीचे घरी संमेलन भरे.त्या सगळ्या वास्तववादी कथा होत्या. 
  सुनेचा छळ,मनाचा कोंडमारा,अत्याचार, दुय्यम
वागणूक त्या संमेलनात उलगडली जात असे. कथाकार आणि श्रोते डबडबलेल्या नेत्रांनी या कथा विश्वात एकरुप होत. हे आगळे वेगळे संमेलन साऱ्या भगिनी वर्गाची मने मोकळी करत असे. "गुराखी" या कथासंग्रहात सुख-दु:ख, ऊन -पाऊस, यश- अप यश , श्रेयश- प्रेयश यांचा वर्षाव होतो. या नायकाने मुखपृष्ठावर चित्रीत केल्या प्रमाणे म्हशीवर बसुन केवळ पुस्तक वाचले नाही. तर निसर्ग वाचला. आणि त्याची उत्तम कैफियत सादर केली. लेखकाचा हा पहिलाच कथासंग्रह असुनही खूप लक्षणीय व ग्राम जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारा आहे. हे लेखकाचे मोठे यश आहे! त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करुन मी माझे अध्यक्षीय मनोगत पूर्ण करतो.
.