NC Times

NC Times

गुराखी हा कथासंग्रह मराठी साहित्यात स्वतःची ओळख निर्माण करेल -ह.भ.प.प्रा.सौ. सरस्वती(ताई)भोसले वाशिवले


गु--- गुरांना आपले म्हणून समजून जीव लावणारे लेखक 
रा--- राखण ,रक्षण करावे पर्यावरणचा संदेश देणारे वस्तूनिष्ठ लेखन 
खी - खिलाडू प्रवृत्तीने जीवन जग ण्याचा व ग्रामीण बाज व जीवन शैलीचे जीवंत वर्णन करणारे लेखक व त्यांचे लेखन आहे.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।१।।
श्री प्रा.लांवड सर  म्हणजे एक  ग्रामीण लेखक ,एक मनोरंजक वक्ता ,एक शिक्षक व्यक्तीमत्व यांचे लेखन म्हणजे  भूतकाळातील जाण, वर्तमान काळा तील ज्ञान आणि भविष्याची नवी चाहूल करून देणारे, जीवनातील अनेक  क्षणांना सजवून ठेवणारे, प्रगल्भ माहिती पुरवणारे  माहितीचा स्रोत होय. या सर्वांचा परिपोष म्हणजे हा "गुराखी "कथासंग्रह होय. गुरे राख ताऱ्या एका ग्रामीण मुलाच्या जीव नाचा प्रवास , एक सुशिक्षित प्राध्यापक ते एक प्रतिभावंत व्यक्तीमत्वात कसा होतो ते वाचताना वाचक आचंबित होतो. जीवनातील सुख-दु:खातील घटना प्रसंगाची अचुक मांडणी करताना एक नवी सृजनता उदय होताना दिसतो.  'गुराखी'हा कथासंग्रह मराठी साहित्यात स्वतःची ओळख निर्माण करेल प्रा. संभाजी रा. लावंड. यांच्या गुराखी या कथासंग्रहातील लेख नाला खटाव तालुक्यातील खातगुणच्या काळ्या कसदार पिकाऊ मातीचा परीस स्पर्श व  गंध प्राप्त झाला आहे. ग्रामीण कथा वाचकांना थेटआपापल्या गावात अलगद नेवून सोडतात. आपाप ल्या भागातील नदी, नाले, ओहळ, जसेच्या तसे आठवतात. लेखक वाच कांना भुतकाळात घेऊन जातो.संपूर्ण कथा वाचताना आपण लेखका बरोबर असल्याचा वस्तुनिष्ठ अनुभव येतो. त्यांच्या कथेतील पात्रे , प्रसंग, घटना, संवाद ,भाषा शैली आपल्या खेडेगावा तीलच वाटतात. ग्रामीण भागातील सुर्योदय व सुर्यास्त रानातील व आपल्या शिवारातील वाटतो.गांव खेडं तेथील झाडांची गर्दी, गावातील वयो वृध्द माणसे, त्यांचे दैनंदिन जगणे आणि मनोव्यथा, समस्या, सुखदुःखे, आपण अनुभवले असल्याने वाचकांना ती अगदी जवळची वाटतात. अशी माणसे आपापल्या खेडोपाडी पूर्वी  भेटली होती. पण ती आज हयात नसल्याने लेखकां बरोबर आपण ही उदास व दु:खी बनतो. ग्रामीण जीवन शैली आनंददायी आहे.पण चांगले मार्गदर्शन मिळत नसल्याने होणारे नुकसान जीवन ढवळून काढते. म्हणुन जगताना येणारी मजा, खुमारी, बदलणारे गावातील भावकीतील सोयीचे राजकारण आणि संकेत, वाच कांना अस्वस्थकरतात.संसारातील जीव घेण्या गरजेच्या व काही वेळा आर्थिक समस्या सोडवताना निरक्षर आई वडिलांची होणारी घुसमट, कथेतील भाव प्रसंगातील शब्दांचीअचुक गुंफण अवर्णनीय अशीच आहे. या व अशा शैलीमुळे कथा वाचकांना बांधून ठेवतात. मानवी भावभावनांचे चित्रण करताना जगण्याचे कंगोरे उलगडून दाखवतात. येथून पुढे ते सजग, समृध्द, ग्रामीण कथा  वाचकांना देत रहातील याची मला नक्की जाणीव आहे. मराठी ग्रामीण कथा या प्रकारात श्री संभाजी रा, लावंड यांचा गुराखी कथासंग्रह स्वतःची एक वेगळी ओळख निश्चित निर्माण करेल, याची मला खात्री आहे. लेखक प्रा. लावंड यांना मनस्वी लेखन करणारा लेखक, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 
लेखकाच्या मनातील अस्वस्थता काही कथामधून जाणवते.त्यांचे व्यक्तीमत्व म्हणजे लेखनाची सृजनशीलता आहे.आई विषयीचे प्रेम, माया, आपु लकी  प्रेम व्यक्त करताना एक विचा रवंत मुलगा दिसून येतो.एकूण चोवीस कथेतील  खेडेगावातील कथा, शिवारा तील कथा ,दारिद्रयाशी झुंजणाऱ्या, आईवडीलांवरील कथा, गावाकडचे खेळ आणि बाल खोड्या संबधीचा कथा, शालेय जीवनावरील आणि शिक्षण क्षेत्रावरील कथा , या सर्व  कथा माणसांची पारख कशी करावी,माणसे कशी वाचावी, जीव नातील समस्यांना कसे तोंड द्यावे,  व्यक्ती तितक्या प्रकृती' व्यक्ती रेखा , स्वभाव वैशिष्ट्ये,  भूतदया,  या सर्वांचा  परिपोष म्हणजे हा कथासंग्रह लहान पासून-मोठ्यापर्यंत,आणि प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडेल, समजेल अशा सोप्या  भाषेतील हा मराठी कथासंग्रह वाचकांना, समीक्ष कांना लक्षवेधी ठरेल असा आत्मविश्वास मला वाटतो.त्यांना त्यांच्या पुढील लेखन वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!
ह.भ.प. प्रा.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले .