विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे,आणि नवीन शोधांना प्रेरणा देणे, या साठी असतात ती ' विज्ञान प्रदर्शने 'आणि ' इनस्पायर ॲवार्ड प्रदर्शने ' आयोजित केली जातात
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन/महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान अहमदाबाद,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर,नागपूर
आणि यशवंत राव चव्हाण काॅलेज ऑफ सायन्स कराड
यांच्या संयुक्त विद्यमाने12वे राज्यस्तरीय इनस्पायर ॲवार्ड विज्ञान प्रदर्शन सन 2022-23विज्ञान प्रदर्शन बक्षिस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाणजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली त्यांची कर्म भूमी,तसेच माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वी राज चव्हाण जी,शिक्षण क्षेत्रातील 'भगीरथ 'आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील या सर्वांचे आशीर्वाद असलेली पावनभूमी,कृष्णा - कोयना प्रिती संगम पवित्र भूमी *कराड* येथे कृष्णाकाठच्या कराड मधील यशवंत राव चव्हाण काॅलेज ऑफ सायन्स , कराड 12 वे राज्यस्तरीय इनस्पायर ॲवार्ड प्रदर्शन 2022-23दिनांक 22एप्रिल ते24 एप्रिल या कालावधीत भरले या बक्षिस वितरण समारंभ सोहळ्याचे यांच्या शुभहस्ते मा.डाॅ. दिपक पिंजारी
असोसिएट प्रोफेसर इनस्टयूट ऑफ केमिकल टेक्नोलाॅजी मुंबई,प्रमुख उपस्थिती डाॅ.राधा अतकरी संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर,अध्यक्ष मा.श्री.दिलीप चव्हाण
सदस्य श्री.शिवाजी शिक्षण संस्था,उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर कराड.या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.यामध्ये एकूण सहभाग 131 विद्यार्थ्यीं -विद्यार्थ्यींनी महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यामधून ,यामधील 13 उपकरणांची निवड केंद्रीय स्तरावर झाली आहे.विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, गुलाब पुष्प,देऊन
मान्यवरांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये केंद्रस्तरावर निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे- (कंसात -जिल्हा नाव असे.)
1) चिन्मय गावत (अकोला) 2)सर्वेश मोहरील (बुलढाणा)
3)विश्वजित भालेराव (छत्रपती संभाजी नगर) 4) पृथ्वीराज राणे(बीड) 5)रीधा खातीब (कोल्हापूर) 6)ध्रुव कोरे (गडचिरोली) 7) यशराज शिंदे (नाशिक) 8)शार्दुल यादव (सातारा) 9)संज्ञा वाशिवले(सातारा) 10)प्रणव यादव (सातारा) 11)सिद्धार्थ भंडारी (सोलापूर) 12) अनुराग जुन्नरकर (पुणे) 13)गायश्री शिगांडे (पुणे) अशी निवड झालेली विद्यार्थ्यांची नावे आहेत. सातारा जिल्ह्यातील , 1)शार्दुल यादव (सातारा) 2)सज्ञा वाशिवले(सातारा) 3)प्रणव यादव(सातारा) तीन विद्यार्थ्यांमधील कु.सज्ञा ज्ञानदेव वाशिवले मौजे वाशिवली येथिल कन्या,खरे पाहता, 'विविधतेत ही एकता जोपासणारा, नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती ने नटलेला भारत देश देशातील विविध परंपरा व संस्कृती यांचे संवर्धन करणारे महान असे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शूरवीरांच्या,स्वातंत्र्य सैनिकांचा,बाणेदार असा सातारा जिल्हा अश्या जिल्ह्यातून प्रसिद्ध अश्या धार्मिक, ऐतिहासिक,अध्यात्मिक, तीर्थक्षेत्र ' दक्षिण काशी 'म्हणून ओळखला जाणारा वाई तालुका,या तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगातील, जैवविविधतेने सजलेल्या, पश्चिम घाटातील सौंदर्याने नटलेल्या, व हिंदवी स्वराज्य ची जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, त्या रायरेश्वराच्या पायथ्याशी धोमधरणाच्या शेजारी *वाशिवली* छोटेसे गाव ,
पर्यटन क्षेत्र प्रसिद्ध असे महाबळेश्वर तालुक्याच्या घाटाचा जेथून प्रवास सुरू होतो अशा घाटाच्या सुरुवातीलाच निसर्गाच्या सान्निध्यातील ' ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (पसरणी,वाई)या शाळेतील इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांनी, विज्ञान प्रदर्शनासाठी दिल्ली येथे निवड.या साठी तिला मार्गदर्शन करणारे तीचे गुरूवर्य, कु .लीना गोपाळ राव जाधव ,पालक-श्री.ज्ञानदेव विष्णू वाशिवले.(मुकाई देवी माध्यमिक विद्यालय वाशिवली). तसेच जिल्हा समन्वयक श्री.उबाळे सर, या प्रसंगी उपस्थित होते. या सर्व नववैज्ञानिक,नव संशोधक यांना, पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा!!
त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे ,पालकांचे व या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन सर्व च करत आहेत.