NC Times

NC Times

सलमान खानच्या घरासमोर फायरिंग अबकी बार गोळीबार सरकार - सुप्रियाताई सुळे


नवचैतन्य टाईम्स  मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्याचवेळी 'अबकी बार गोळीबार हटाव सरकार' अशी घोषणाही त्यांनी दिली.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं, त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी इथं आले होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण आमच्याकडून होण्यासाठी वाटेल ते करू, असे त्या म्हणाल्या
भर रस्त्यात गोळीबार हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार प्रकरण धक्कादायक आहे. भर रस्त्यावर असे होत असेल तर हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भर रस्त्यावर अशा प्रकारे गोळीबार होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपकी बार गोळीबार सरकार या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे, हे सरकार हटविण्याची आता गरज आहे"
पुण्यात कोयता गँगची दहशत
राज्यात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुण्यातदेखील कोयता गॅंगची दहशत सुरूच आहे. कोयता गॅंगला पुन्हा डोकं वर काढू देणार नाही, असे सांगितले जाते. तरीही कोयता गॅंगची दहशत पुणे परिसरात कायम आहे, या गँगला वेळीच रोखायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मोदी सरकारला संविधान बदलायचे आहे, त्यासाठी ४०० पार चा नारा
महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. भाजपचे खासदार आम्हाला संविधान बदलायचे आहे, असे बोलले होते. एक प्रकारे त्यांच्या पोटातलं ओठावर आले असून या सरकारला संविधान बदलायचं आहे त्यासाठी त्यांनी ४०० पार ची घोषणा दिली आहे, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.