NC Times

NC Times

ग्रामीण साहित्याशी मैत्री करणारे "गुराखी "ही एकअस्सल दर्जाची कलाकृती- प्रा. पोपटराव काटकर


 प्रा. संभाजी लावंड यांच्या "गुराखी" या कथा संग्रहाचे मांन्यवराचे हस्ते नुकतेच प्रकाशन झाले.त्या बद्दल माझे दोन शब्द व्यक्त करतो. प्रा.संभाजी लावंड हे सातारा जिल्ह्यातील नैसर्गिक दृष्ट्या कायम दुष्काळाचे वरदान लाभलेल्या, अशा या खटाव तालुक्यातील खातगुण गावचे सुपुत्र आहेत. खातगुणच्या माय पांढरीमध्ये त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी पर्यंतचे गावातील जीवन शिक्षण विद्या मंदीरात झाले.वेदावती हायस्कूलची गावात नव्याने स्थापन केले परंतु मान्यता प्राप्त नसल्याने सर्व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.पहिली पिढी हकनाक  बाद झाली. दहावीसाठी पुसेगावला जावे लागले. खटाव काॅलेजात गेल्यावर प्रा. सुरेश शिंदे सरांचा अध्यापनाचा मोठा प्रभाव लेखकावर होतो,आणि मराठी साहित्याची अनावर ओढ लागते. आईवडीलांना ते शेती मध्ये मदत करीत ,करीतच ते लहानाचे मोठे आई पांढरीतच झाले.उच्चशिक्षित ही झाले,ग्रामीण संस्कृतीशी एकरुप झाल्याने लेखकाने आपले जीवंत अनुभव  लेखनातून स्पष्टपणे मांडलेले आहेत. ग्रामीण भाग, ग्रामीण संस्कृती अज्ञान, अशिक्षित पणा याचेच अधि राज्य अधिक आणि यातच उच्च ध्येय ठेवून प्रा. संभाजी लावंड पुढे गेले आहेत. "गुराखी "या कथासंग्रहात त्यांनी जे मांडले आहे, ते प्रत्यक्ष त्यांनी अनुभवले आहे. साक्षी रूपाने केलेले, व तटस्थपणे पण जिव्हाळ्याने लेखन केलेले आहे.ते तसे जगले आहेत ते अधिक वास्तव दर्शनी बनलेले दिसतात. शेतकरी कुटुंबाचा शेतीशी अधिक्याने संबंध असतो. खूप कष्ट करुनही शेतीतुन निघणारे उत्पन्न कमी, मग म्हशीचे रेडकू पाळणे, तिच्या पासून निर्माण झालेली गुरे व त्यांना जीव लावणारे बाल लेखकाला वाचनाचे वेड गाव परिसरात माहिती आहे.त्यात त्यांच्या आईवडिलांच्या मनाची होणारी अगतिकता, अस्वस्थता , तगमग लेखनातून अचूकपणे मांडली आहे.ग्रामीण भागा तील बलु तेदारी पध्दती, एकमेकांना मदत करण्याची पध्दती, गावातील हिंदु मुस्लिम यांचे एक्य , मात्र काही प्रमाणात आढळणारी निसर्ग नियमानुसार बेरकी माणसे हे सर्व या लेखनात मांडली  आहेत. वडीलांचा कष्टाळू व रागीट स्वभाव व आईचा प्रेमळ स्वभाव सर्वांशी मेळ घालण्याची, भावंडांचे कष्ट हे सर्व लेखनातून व्यक्त केले आहे.गुराखी या कथासंग्रहात खातगुण आणि परिसरातील घटना बाबी यांची अप्रतिम वर्णने आहेत. शिवाय नोकरीत आलेल्या अनुभवांचे वास्तव रेखाटन केले आहे.श्री लावंड सर नोकरी निमित्त गावापासून दूर असले तरी ,आपल्या गावाशी, ग्रामीण संस्कृतीशी असलेली त्यांची  नाळ तुटलेली नाही. खातगुणच्या गावाशीइथल्या मातीशी,लोक संस्कृतीशी त्यांचे जडलेले भावनिक नाते पहावयास मिळते.प्रा.लावंड हे उत्तम लेखक, कवी, गायक, शिक्षक आहेत. सतत नवनिर्मितीसाठी त्यांची धडपड चालू असते.सुप्रसिद्ध ग्रामीण साहि त्यिक व्यकटेश माडगूळकर, आनंद यादव, रा. र. बोराडे, आण्णा भाऊ साठे, प्रा. मिरासदार या मान्यवरांनी ग्रामीण साहित्याची निर्मितीकेली. ते ग्रामीण भागाला सामोरे आदर्श मानूनच होय, प्रा. लावंड यांनी ही लेखनात कुठे ही तोच तोचपणा, एकसुरीपणा आणलेला नाही. मुर्तीमंत निसर्ग उभा केला आहे. त्यामुळे त्यांचे लेखन हे आदर्शवत व वस्तुनिष्ठ झाले आहे. गुराखी या पुस्तकात हुबेहुब प्रसंग त्यांनी त्यांनी उभे केले आहेत. त्यामुळे गुराखी ही साहित्य कृती अस्सल दर्जीची बनली आहे. प्रा. संभाजी लावंड यांना पुढील साहित्यीक कलाकृती निर्मितीसाठी शुभेच्छा व सदिच्छा देतो. 
प्रा.पोपटराव काटकर. कुकुडवाड. माण सातारा