NC Times

NC Times

सातारा कोरेगाव तालुक्यामध्ये मतदान जनजागृतीचे विविध ठिकाणी कार्यक्रम


नवचैतन्य टाईम्स  सातारा /कोरेगाव                 प्रतिनिधी( राजेंद्र शेडगे )- कोरेगाव          तालुक्यातील सिद्धार्थनगर येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेवून गावातील लोकानी गावांमधून मतदान जनजागृती विषयी घोषणा देत रॅली काढली,या रॅलीमध्ये गावातील सर्व लोकांनी सहभाग घेतला . 
यावेळी पंचायत समितीच्या कृषि अधिकारी सों हेमांगी शेडगे ,पर्यवेक्षका उर्मिला साळुंखे,ग्रामसेवक विनोद बनकर, मतदान जनजागृती पथकप्रमुख यशेंद्र क्षीरसागर इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी शेडगे मॅडम यांनी गावकाऱ्याना मार्गदर्शन केले यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे ,आपण शंभर टक्के मतदान करून आपण आपल्या भागातील योग्य प्रतिनिधीला निवडून देण्यास आपल्या सर्वांनी हातभार लावणे गरगेचे आहे.त्या पुढे असेही म्हणाल्या की यामुळे भारताची समृद्धी विकास होईल . यावेळी श्री क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मतदान हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे आणि तो शंभर टक्के बजावून  आपण आपल्या मुलाच्या पुढच्या पिढीपुढे चांगला आदर्श ठेवला पाहिजे 
मतदान जनजागृती कार्यक्रमावेळी गावातील सर्वानी सहभाग घेतला .यावेळी तरुण वर्ग लहान मुलांनी जनजागृती विषयी रॅली काढून घोषणा दिल्या . यावेळी उर्मिला साळुंखे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली .