NC Times

NC Times

घाटनांद्रेत मतदार जनजागृती रॅली संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे मे जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशानुसार ग्रामस्थ,शिक्षक, कर्मचारी,विद्यार्थी व मतदार यांनी एकत्रितपणे गावातील प्रमुख मार्गावरून मतदार जनजागृती रॅली काढली.त्याचे संयोजन ग्रामसेवक झैलसिंग पावरा यांनी केले.


७ मे रोजी होणाऱ्या ४४ क्रमांकच्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही जनजागृती मोहीमे अंतर्गत ही रॅली काढण्यात आली होती.या कार्यक्रमासाठी संपर्क अधिकारी दत्तात्रय पाटील हेही उपस्थित होते.यावेळी सरपंच अमर शिंदे, ग्रामसेवक झैलसिंग पावरा, तलाठी पी एस वायदंडे, पोलिसपाटील एकनाथ उर्फ महादेव शिंदे, मुख्याध्यापक बी एस शिंदे,कोतवाल शिवाजी वाघमारे,आरोग्य विभागाच्या डॉ विद्या पाटील, विनायक कुडचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिक्षक,कर्मचारी ग्रामस्थ,विद्यार्थी,मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मतदान करण्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी पोलिसपाटील एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.