NC Times

NC Times

मंगळवार पासून कुची येथे सामुदायिक श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-सालाबादप्रमाणे याही वर्षी कुची (ता कवठेमहांकाळ) येथील श्री हनुमान मंदिरजवळ मंगळवार दिनांक ९ पासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन केले आसल्याची माहिती सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.सदर पारायणा निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे.यामध्ये हारीपाठ,ज्ञानेश्वरी वाचन, आरती, भजन, किर्तन,प्रवचन,जागर,काकडा,अखंड विणावादन याचा  समावेश आहे.
मंगळवार दिनांक ९ रोजी सायंकाळी ६ ते ७ हभप शिवाजी यादव-महाराज (वज्रचोंडे) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ या वेळेत हभप भागवत महाराज (संत नणदी) यांचे किर्तन होणार आहे.त्यानंतर रुक्मिणी भजनी मंडळ (शेरीमळा-कुची) यांचा जागर होणार आहे.बुधवार दिनांक १० रोजी सायंकाळी ६ ते ७ हभप अर्जुन महाराज (गर्जेवाडी) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ हभप कुलदीप खोत-महाराज (कोल्हापूर) यांचे किर्तन होणार आहे.त्यानंतर हनुमान भजनी मंडळ (कुची) यांचा जागर होणार आहे.गुरुवार दिनांक ११ रोजी सायंकाळी ६ ते ७ यावेळेत हभप किसन काशीद-महाराज (मोरगाव) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ या वेळेत हभप नवनीत-महाराज (करगणी) यांचे किर्तन तर त्यानंतर हनुमान भजनी मंडळ (कुची) यांचा जागर होणार आहे.शुक्रवार दिनांक १२ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हभप राम पाटील-महाराज (सोनी) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ यावेळेत हभप नारायण एकल-महाराज (राधानगरी) यांचे किर्तन तर त्यानंतर माऊली भजनी मंडळ (कुची) यांचा जागर होणार आहे.शनिवार दिनांक १३ रोजी सायंकाळी ६ ते ७ हभप संपतराव जाधव महाराज (तिसंगीकर) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ या वेळेत हभप हरिप्रसाद महाराज (देहूकर) यांचे किर्तन त्यानंतर जागर होणार आहे. 
 त्याचबरोबर रविवार दिनांक १४ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हभप मंगेश उपासे-महाराज यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ या वेळेत हभप सागर मराठे-महाराज (चोरोची) यांचे किर्तन होणार आहे.तर त्यानंतर कुंडलापुर भजनी मंडळ (कुंडलापुर) यांचा जागर होणार आहे.सोमवार दिनांक १५ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हभप अशोक जाधव महाराज (कवठेमहांकाळ) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ या वेळेत हभप देवीदास ढवळीकर-महाराज (पंढरपूर) किर्तन होणार आहे तर लगेचच विश्वशांती भजनी मंडळ (वडगाव) यांचा जागर होणार आहे.मंगळवार दिनांक १६ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हभप बाळकृष्ण-महाराज (वडगाव) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ या वेळेत हभप अनिल डुबुले महाराज (तडवळे) किर्तन होणार आहे तर त्यानंतर जागर होणार आहे.
बुधवार दिनांक १७ रोजी रामनवमी निमित्ताने हभप विष्णू मिर्धे महाराज (आळंदी) यांचे किर्तन होणार आहे तर दुपारी ३ ते ५ भव्य दिंडी सोहळा निघणार आहे तर यामध्ये पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणीचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. 
तर गुरुवार दिनांक १८ रोजी भार्गवराम सपकाळ महाराज कुची यांचे काल्याचे किर्तन होऊन व महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.संपुर्ण कार्यक्रमात आकर्षण रहाणार आहे ते अयोध्या (उत्तरप्रदेश) येथुन आणलेल्या श्रीरामच्या सव्वा लाख रुपये किमतीच्या पादुका.