NC Times

NC Times

एकनाथ खडसे म्हणाले मी भाजपात प्रवेश करणार


नवचैतन्य टाईम्स जळगाव प्रतिनिधी (संजय फरांदे) -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार आहेत.
तीस वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीत राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपात परतणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून स्वतः एकनाथ खडसे यांनीच याबाबत घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे म्हणाले, भाजपामध्ये येण्याचा माझा प्रयत्न नव्हता. परंतु, भारतीय जनता पक्षातील जे जुने कार्यकर्ते आणि नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करत असताना ते म्हणायचे की तुम्ही आत्ता भाजपात असायला हवे होतात. तुम्ही स्वगृही परत आलात तर बरं होईल. गेल्या चार-सहा महिन्यांपासून याबाबत चर्चा चालू होती. परंतु, माझ्या राजकीय परिस्थितीनुसार मी निर्णय घेऊ शकत नव्हतो. आता केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करून ते सांगतील त्या तारखेला मी दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश करणार आहे.