NC Times

NC Times

कुटुंबाच्या विरोधात माजी मुख्यमंत्री यांच्याशी विवाह अभिनेत्री ही पतीपेक्षा २७ वर्षानी लहान,आज १२४ कोटींची मालकीण


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-सिनेइंडस्ट्रीत अशा अनेक लव्हस्टोरी आहेत, ज्या ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. १८ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत अशीच एक सीक्रेट लव्हस्टोरी समोर आली, ज्याने कर्नाटकात मोठी खळबळ माजली होती. ही लव्हस्टोरी होती कन्नड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री राधिकाची. राधिकाने २००६ मध्ये घेतलेल्या निर्णयाची सिनेइंडस्ट्रीसह राजकीय क्षेत्रातही मोठी चर्चा झाली होती. या निर्णयानंतर अभिनेत्रीचं करिअर संपलं. त्याशिवाय कर्नाटकातील जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या खासगी आयुष्यासह राजकीय करिअरमध्येही मोठी खळबळ माजली होती.
अभिनेत्री राधिका २००२ मध्ये आलेल्या कन्नड सिनेमा 'नीला मेघा शमा' मधून चर्चेत आली होती. तिचा पहिला सिनेमा 'नीनागागी' होता. अभिनेत्रीच्या पहिल्या सिनेमावेळी ती केवळ इयत्ता ९वीमध्ये शिकत होती, तिचं वय १४ वर्ष होतं. पण तिचं फिल्मी करिअर अधिक काळ चालू शकलं नाही. राधिकाने ३०हून अधिक सिनेमात काम केलं, पण तिचे सिनेमे फारसे चालले नाहीत. सिनेमे चालत नसल्याने अभिनेत्री निर्मितीकडे वळली. २०१२ मध्ये तिने लकी या तिच्या पहिल्या कन्नड सिनेमाची निर्मिती केली होती.
२०१० मध्ये अभिनेत्रीच्या सीक्रेट लग्नाबाबत गोष्टी समोर आल्या आणि एकच खळबळ माजली होती. २००६ मध्ये तिने जेडीएस नेता एचडी कुमारस्वामी यांच्याशी लग्न होतं. या लग्नाची माहिती तिने २०१० मध्ये दिली. दोघांनी एक मुलगी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांचं लग्न झालं त्यावेळी एचडी कुमारस्वामी ४७ वर्षांचे होते, तर राधिका त्यांच्याहून २७ वर्ष लहान होती. कुमारस्वामी यांचं हे दुसरं लग्न होतं. राधिकाचंही हे दुसरं लग्न होतं. २००० मध्ये तिने रतन नावाच्या मुलाशी लग्न केलं होतं, पण त्याचं लग्न फार काळ टिकू शकलं नव्हतं.
राधिकाच्या वडिलांना कुमारस्वामी यांच्याशी आपल्या लेकीचं लग्न करुन द्यायचं नव्हतं. पण राधिकाने वडिलांच्या विरोधात जात हे लग्न केलं. दोघांनी आपलं लग्न सीक्रेट ठेवलं होतं. अभिनेत्रीच्या या लग्नाने तिच्या वडिलांना मोठा धक्का बसला होता.                                         अभिनेत्री राधिका सिनेइंडस्ट्रीत फ्लॉप ठरली, पण कर्नाटकातील माजी मुख्यमंत्र्यांशी लग्न करुन ती कोट्यवधींची मालकीण झाली. मीडिया रिपोर्टनुसार, राधिका १२४ कोटींची मालकीण आहे.