NC Times

NC Times

सर्वत्र हनुमान जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा


नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(ह.भ.प.प्रा.सौ.            सरस्वती ताई भोसले-वाशिवले)
हनुमान जन्मोत्सव
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।

जिनकी मन के समान गति और वायु के समान वेग है, जो परम जितेन्दिय और बुद्धिमानों में श्रेष्ठ हैं, उन पवनपुत्र वानरों में प्रमुख श्रीरामदूत की मैं शरण लेता हूं।
     सर्व देवतांमध्ये हनुमान देखील एक शक्तिशाली व बुद्धिमान देवता आहे. हिंदू धर्मामध्ये विविध येणाऱ्या संकटांपासून हनुमान मुक्ती देतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे. हनुमानाने केवळ रामायणातच नाही, तर महाभारतात देखील अर्जुनाच्या रथाची रक्षा केलेली आपल्याला महाभारतातील लेखात कळते. त्यानंतर कलियुगातही हनुमान संकटांपासून पृथ्वीचे तसेच मानवी जीवनाचे रक्षण करतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे.
      हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी साजरा केला जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म प्राप्त होतो. त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट्रात  हनुमानाला मारुती म्हणतात. महाराष्ट्रात शनिवार तर उर्वरित भागात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल, तसेच रुईची फुले आणि पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे. 
      मारुतीला नारळ फोडण्याचीङघृ परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्याने केवळ एका हातावर द्रोणागिरी पर्वत उचलला तसेच समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश केला असे पुराणांमध्ये उल्लेख आहे. हनुमान श्रीराम यांची भक्ती करत होते. आणि या भक्तीतून हनुमानाला शक्ती मिळत होती. पुढे हनुमान हा श्रीराम यांचा आवडता परमभक्त झाला. हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला आहे. हनुमानाचे वडील केसरी हे होते. लहानपणापासून त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या.
     एकदा सूर्याकडे आकर्षित होऊन त्याला गिळायला म्हणून हनुमानाने सूर्याकडे कूच केले. इंद्र देवासह सर्व देव भयभीत झाले होते. इंद्रदेवाने सूर्याला आणि पृथ्वीला वाचविण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले. त्यामुळे हनुमंत मूर्च्छित झाले त्यानंतर पवन देवाने सर्व सृष्टीतील वायू थांबवून घेतला. त्यामुळे प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले, त्यानंतर सर्व देवतांनी हनुमानाला मूर्च्छितेतून  बाहेर आणले व पवन देव शांत होऊन सुरुवाती सारखे वायू पर्यावरणात सोडले. तसेच तेव्हा हनुमानाला सर्व देवतांनी आशीर्वाद देत काही शक्ती प्रदान केल्या.
     एक दिवस खेळते वेळी हनुमानाने एका ऋषीचा परिहास केला. त्यामुळे त्याला शाप मिळाला तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल. पुढे प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असतांना त्यांची आणि हनुमंताची भेट झाली. हनुमान यांनी प्रभू श्रीरामाची वनवासात आणि युद्धादरम्यान फार मदत केली. हनुमंताच्या आणि वानर सेनेच्या बळावरच श्रीराम यांनी रावणाशी युद्ध केले आणि शेवटी जिंकले देखील.                                 सर्वत्र हनुमान जयंती  उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा 
रोगमुक्तीसाठी वीर हनुमान मंत्राचा प्रयोग करतात. भूतबाधा झाली असता, त्याला हनुमानाच्या मंदिरात नेतात किंवा हनुमान मंत्र, स्तोत्रे म्हणतात. स्त्रिया पुत्र प्राप्तीसाठी मारुतीची उपासना करतात. निपुत्रिक स्त्रीने भिंतीवर शेंदूराने मारुतीची आकृती काढून त्याची पूजा करते. त्याच्यापुढे चढते-उतरते, कणकेचे दिवे लावावे. शनिवारी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची किंवा फुलांची माळ घालून त्याला उडीड वाहा . हनुमानाची उपासना ही मनोकामना पूर्ण करणारी आणि लौकिक सिद्धी प्राप्त करून देणारी आहे, असा लोकांचा विश्वास आहे.
हिंदू धर्मामध्ये हनुमान जन्यामण ही मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला असता यज्ञातून अग्निदेव प्रकट होऊन, त्यांनी दशरथाच्या राण्यासाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्याप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस म्हणजेच खीर यज्ञातील हा प्रसाद दिला होता. त्यादिवशी चैत्र दिवस!  हनुमान जयंती म्हणून साजरा करतात.
 काही पंचांगांच्या मते,ण हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे. तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे.महाराष्ट्रातील हनुमान जन्येय चैत्र पौर्णिमेला साजरी होठिहच्या दिवशी लोक हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात.  काही लोक उपवास ठेवतात, समर्पण आणि उत्साहाने त्यांची उपासना करतात.  हनुमानाबद्दल असे म्हटले जाते की, हनुमान ब्रह्मचारी होते, त्यांना जानवे देखील परिधान केले जाते.  हनुमानजीच्या मूर्तींवर सेंदूर आणि चांदीचे काम करण्याची परंपरा आहे. काही लोकांच्या मते, एकदा रामाच्या दीर्घायुष्यासाठी हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर सेंदूर लावला होता. म्हणूनच त्याला आणि त्यांच्या भक्तांना चोळा असे म्हणतात.  संध्याकाळी दक्षिण मुखी हनुमान मूर्तीसमोर मंत्र, जप आणि जाप करण्यास अत्यंत महत्त्व दिले जाते.   तुलसीदासच्या रामचरित्रमानसमध्ये हनुमानाची माहिती वाढवली दिसते. हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व मंदिरात हनुमान चालीसा मजकूराचे वाचन होते.
     सर्वत्र भंडाराचे आयोजन केले जाते.  तमिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्या आणि ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हा उत्सव चैत्र पौर्णिमेपासून वैशाख महिन्याच्या दहाव्या दिवसापर्यंत साजरा केला जातो.
हनुमान जयंतीविषयी पौराणिक कथा:? हनुमान जयंती विषयी शिवपुराणात एक कथा आहे. ती म्हणजे एकदा महादेवाने विष्णूचे मोहिनी रूप पाहिले त्यामुळे शिव कामासक्त झाला आणि त्याचे वीर्यपतन झाले. सप्तर्षीनी ते वीर्य पानावर घेऊन कर्णद्वारे गौतामिकांया अंजनीच्या ठिकाणी स्थापन केले. त्या वीर्यामुळे अंजनी गर्भवती झाली व तिने हनुमानाला जन्म दिला.
    एकनाथी भागवतात महाराष्ट्रात प्रचलित असलेली कथा दिली आहे. दशरथाने पुत्रकामेष्टी केला. त्या वेळी पायसाचा एक भाग घारीने पळवला आणि पर्वतावर ध्यान करत असलेल्या अंजनीच्या पदरात टाकला. अंजने तो खिरीचा प्रसाद भक्षण केला आणि कालांतराने हनुमानाला जन्म दिला.लक्ष्मण मूर्च्छित पडला असता, हनुमान द्रोनागिरी पर्वत घेऊन जात असताना, त्याला भरतने बाण मारल्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत झाल्यानंतर त्याच्या पायांना शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली म्हणून हनुमंताला शेंदूर आणि तेल वाहतात असे म्हटले जाते.
हनुमानाची वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मंदिर आहेत. तसेच विदेशातही हनुमानाची मंदिरे प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येतात. अशाप्रकारे हनुमानाचा महिमा वाढत रहावा हा त्यामागचा उद्देश आहे.
शिक्षण सिसहनुमान जयंती भगवान हनुमानाची जयंती म्हणून साजरी केली जाते. हनुमान हे रामाचे भक्त आहेत आणि ते रामायणातील मध्यवर्ती व्यक्तींपैकी एक असल्याने हे स्पष्ट होते. असे म्हटले जाते की, , ?   हनुमानाच्या जन्माची उत्पत्ती देखील रामाच्या युगाशी जोडलेली आहे.! 
    हनुमान जयंतीला काय करू नये दिवस गोड खाऊनच साजरा करावा असे म्हणतात. – हनुमान जयंतीला चुकूनही तामसिक अन्न जसे की मांस, मासे, अडी, लसूण, कांदा इत्यादींचे सेवन करू नये . – हनुमानजींच्या पूजेमध्ये पंचामृत आणि चरणामृताचा कोणताही नियम नाही. त्यामुळे पूजा करताना त्यांचा वापर करू नये.
हनुमान अवतार कथा व हनुमान कथा भक्तासाठी लाभदायक फल
राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस, म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या अंजनीला म्हणजे मारुतिरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिरायासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुति राहूच आहे, असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतिरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला *हनुमान* हे नाव पडले.हनुमान रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. 
तो पवनपुत्र व महाबली होता व त्याला अनेक शक्ती जन्मतःच प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली.सूर्याला व पृथ्वीला वाचविण्या साठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने मारून फेकले. त्या प्रहाराने हनुमान मूर्च्छित झाला. नंतर देवांनी त्याला ‘तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल’ असा शाप दिला. पुढे राम वनवासात फिरत असताना त्याच्या शी हनुमानाची भेट झाली व तो रामाचा निस्सीम भक्त बनला. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेकडे पोहोचवला.
 रावणाच्या सैनिकांनी त्याला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला आग लावली. तेव्हा त्याने आपल्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली आणि परत जाऊन सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने हिमालयात झेप घेतली आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणला.त्या पर्वतावर आढळणार्‍या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले. 
हनुमान हे चिरंजीव आहेत म्हणजे ते अजूनही जिवंत आहेत. ते सर्वात बलवान आहेत. त्यांचा उल्लेख महाभारतात देखील येतो. त्यांनी महाभारतात अर्जुनाच्या ध्वजावर बसून त्याचे रक्षण केले होते.
             कार्य आणि वैशिष्ट्ये...
सर्व शक्‍तीमान जन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, अशी जी कथा आहे, यातून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वा पेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्‍तीमान आहे. सगळ्या देवतांमध्ये केवळ मारुतीला वाईट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला ‘भुतांचा स्वामी’ म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्‍तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्‍तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते आणि तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.  राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्‍चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या पराक्रमाचे असे वर्णन केले – ‘वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर जिवंत असता सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.’ हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धूम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य विरांचा नाश केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरि आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत. मारुतिरायाला सर्व व्याकरणसूत्रे ठाऊक होती. त्याला अकरावा व्याकरणकार मानले जाते. तो एवढा बुद्धीमान कसा ? मित्रांनो, जे भक्ती करतात, त्यांची बुद्धी सात्त्विक होते. आजपासून आपणही मारुतिसारखी भक्ती करून बुद्धीमान होऊया.दास्यभक्‍तीचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून अद्याप मारुतीच्या रामभक्‍तीचेच उदाहरण देतात. तो आपल्या प्रभूंकरता प्राण अर्पण करण्यासाठी सदैव सिद्ध असे. त्यांच्या सेवेपुढे त्याला शिवत्व आणि ब्रह्मत्व यांची इच्छाही कवडीमोल वाटत असे. हनुमान म्हणजे सेवक आणि सैनिक यांचे मिश्रण. हनुमान म्हणजे भक्‍ती आणि शक्‍ती यांचा संगम.युद्ध चालू असतांनाही मारुति थोडा वेळ बाजूला जाऊन ध्यानस्थ बसत असे; पण तेव्हा सुद्धा तो सावध असे. त्याची शेपटी गदेवर असायची.अनेक प्रसंगी सुग्रीवादी वानरच काय, पण रामाने ही याचा समादेश (सल्ला) मानला आहे. रावणाला सोडून आलेल्या बिभीषणाला आपल्या पक्षात घेऊ नये, असे इतर सेनानींचे मत असता मारुतीने ‘त्याला घ्यावे’, असे सांगितले आणि रामाने ते मान्य केले. लंकेत सीतेच्या प्रथम भेटीच्या वेळी तिच्या मनात स्वतःविषयी विश्‍वास निर्माण करणे, शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी लंकादहन करणे, स्वतःच्या (रामाच्या) आगमनाविषयी भरताला काय वाटते, ते पहाण्यासाठी रामाने त्यालाच पाठवणे, यावरून त्याची बुद्धीमत्ता आणि मानसशास्त्रातील निपुणता दिसून येते. लंकादहनानेही त्याने रावणाच्या प्रजेचा रावणाच्या सामर्थ्यावरील विश्‍वास डळमळीत केला.मारुतीचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते. तो सीतेच्या शोधासाठी लंकेत गेला. तेथे त्याने राक्षस कुलातील अनेक स्त्रिया पाहिल्या; पण एकाही स्त्रीविषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभरसुद्धा आला नाही; कारण त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते. मित्रांनो, देवाची भक्ती करणारा खरा भक्तच आपल्या विकारांवर, म्हणजेच वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो. तो विकारांच्या आहारी जात नाही. आज आपण पुष्कळ शिक्षण घेतो; पण आपले विकार जात नाहीत. याचे कारण आपण देवभक्त नाही.मारुतीला संगीत-शास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक मानलेले आहे. यामागे त्याचा रुद्राशी असलेला संबंध साहाय्यभूत असावा. त्याला रुद्राचा अवतार मानतात. रुद्र हे शिवाचे एक रूप आहे. मारुती हा शिवाचा अवतार असला, तरी रामाच्या उपासनेने त्याच्यातील विष्णुतत्त्व जास्त झाले आहे. शिवाच्या डमरूतून नाद निर्माण झाला; म्हणून शिवाला संगीताचा कर्ता समजतात. मारुतीच्या अंगच्या गायनी कलेमुळे समर्थ रामदासस्वामींनी त्याला ‘संगीतज्ञानमहंता’ असे संबोधले आहे.हा नवसाला पावणारा देव आहे, या श्रद्धेमुळे व्रत किंवा नवस म्हणून कित्येक स्त्रीपुरुष मारुतीला प्रतिदिन ठराविक प्रदक्षिणा घालतात. ‘लग्न न होणार्‍या कुमारिकेने ब्रह्मचारी मारुतीची उपासना करावी’, असे जे सांगितले जाते.प्रत्येक वेळी प्रभु श्रीराम अवतार घेतात, तेव्हा ते तेच असतात; मात्र मारुति प्रत्येक अवतारी निराळा असतो. मारुति सप्तचिरंजिवां पैकी एक असला, तरी सप्तचिरंजीव चार युगांचा शेवट झाला की, मोक्षाला जातात आणि त्यांचे स्थान अतिशय उन्नत असे सात जण घेतात.
            
 ।I जय श्रीराम जय हनुमान।।